THANE : घोडबंदर रोडवर मध्यरात्री वाहतूक निर्बंध; प्रवासाआधी जाणून घ्या पर्यायी मार्ग

ठाण्यातील घोडबंदर रोडवर ब्रह्मांड जंक्शन येथे गर्डर बसवण्याच्या कामामुळे ७ एप्रिल रात्री ते ८ एप्रिल सकाळपर्यंत वाहतूक बदल लागू असणार आहेत. पर्यायी मार्गांची माहिती जाणून घ्या.
THANE : घोडबंदर रोडवर मध्यरात्री वाहतूक निर्बंध; प्रवासाआधी जाणून घ्या पर्यायी मार्ग
THANE : घोडबंदर रोडवर मध्यरात्री वाहतूक निर्बंध; प्रवासाआधी जाणून घ्या पर्यायी मार्ग 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड जंक्शन परिसरात सुरू असलेल्या पायाभूत कामांमुळे ठाणे पोलिसांनी मध्यरात्री वाहतुकीत तात्पुरते बदल जाहीर केले आहेत. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी वेळेआधी नियोजन करणे गरजेचे आहे.

गर्डर बसवण्याचे काम, वाहतूक निर्बंध कधी?

उपविभागीय पोलिस आयुक्त पंकज शिरसाट यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रह्मांड जंक्शनजवळील मुल्लाबाग बस डेपो परिसरात ४८ मीटर लांबीचा लोखंडी गर्डर बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. ७ एप्रिल रात्री ११:५५ ते ८ एप्रिल सकाळी ६:०० या कालावधीत वाहतुकीवर निर्बंध असतील.

कोणते रस्ते बंद?

ब्रह्मांड सिग्नलवरून मानपाडा आणि कापूरबावडीकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद असणार आहे. तर एमजी मोटर्स शोरूम (मानपाडा) येथून मानपाडा ब्रीजवर जाण्यास मनाई असणार आहे.

कापूरबावडीसाठी पर्यायी मार्ग

  • ब्रह्मांड सिग्नल → डावीकडे वळा

  • ब्रह्मांड सर्कल → आझादनगर रोड

  • लोढा अमारा समोरील चौक → उजवीकडे वळा

  • कोलशेत-ढोकळी रोड → कापूरबावडी

मानपाडा ब्रीजकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग

  • घोडबंदर मार्ग → मानपाडा ब्रीजलगतचा स्लिप रोड

  • नागोरी टी स्टॉलजवळ → डावीकडे वळा

  • टिकुजीनीवाडी सर्कल → पुढे जा

  • व्हेरियंट नीलकंठ ग्रीन समोरील रस्ता → मुल्लाबाग कटमार्गे पुढे

नागरिकांसाठी आवाहन

वाहतूक पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि प्रवासाचे नियोजन करून सहकार्य करावे, जेणेकरून गर्डर बसवण्याचे काम सुरळीत पार पडेल. या कामामुळे काही तासांसाठी वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता असल्याने, शक्यतो हा मार्ग टाळावा किंवा वेळेआधी निघावे.

logo
marathi.freepressjournal.in