Thane : येऊरमधील अनधिकृत बांधकामाचे सर्वेक्षण; आयुक्तांचे निर्देश, अनधिकृत व्यावसायिक बांधकामांवर होणार कारवाई

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत येऊरच्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात सुरू असलेल्या सर्व अनधिकृत अनिवासी, व्यावसायिक बांधकामाचे महिनाभरात सर्वेक्षण करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत येऊरच्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात सुरू असलेल्या सर्व अनधिकृत अनिवासी, व्यावसायिक बांधकामाचे महिनाभरात सर्वेक्षण करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

येऊरमध्ये अनधिकृत व्यावसायिक बांधकामे आहेत. तेथे जेवणावळी, विवाह, पार्टी आदी समारंभ होतात. अपरात्रीपर्यंत मोठ्या आवाजात, ध्वनिवर्धक, बँड, फटाके वाजवले जातात. या सर्व गोष्टी पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रतिबंधित आहेत. त्यामुळे त्या सर्व गोष्टी तातडीने थांबण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी, सर्वप्रथम तेथील अनधिकृत अनिवासी व्यावसायिक बांधकामाचे सर्वेक्षण महापालिका करणार असल्याचे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील ना विकास क्षेत्र, हरित क्षेत्र येथील अनधिकृत बांधकामांबाबत उच्च न्यायालय यांनी दिलेले निर्देश, तसेच राज्य सरकारने मार्च २०२५ मध्ये काढलेले परिपत्रक यात अनधिकृत बांधकामाबद्दल करावयाच्या कारवाईबाबत मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. त्यानुसार महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई यापूर्वीच सुरू झाली आहे.

शहर विकास विभागाने येऊर येथे निवासी बांधकामांसाठी परवानगी दिली आहे. या बांधकामाचा वापर व्यावसायिक कारणासाठी होतो का, याचीही पाहणी या सर्वेक्षणात करण्यात येणार आहे. सर्व अनधिकृत व्यावसायिक आस्थापना बंद करण्याच्या नोटिसा पाठविण्याचे निर्देशही आयुक्त राव यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत. येऊरमध्ये महापालिका, वनविभाग आणि पोलीस यांची संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे.

टर्फवरील कारवाईचा घेतला आढावा

येऊर येथील १० अनधिकृत टर्फपैकी ०८ टर्फवर कारवाई झाली आहे. दोन टर्फ मालकांनी १० जुलैपर्यंत स्वत:हून टर्फ काढण्याचे मान्य केले आहे. त्यांनी ते न काढल्यास महापालिका त्यावरही कारवाई करणार आहे. या टर्फशिवाय आणखी २ अनधिकृत टर्फची माहिती याचिकाकर्ते रोहित जोशी यांनी या बैठकीत दिली. त्यापैकी एकावर महापालिकेने अनधिकृत बांधकामाच्या विरोधातील विशेष मोहिमेत कारवाई केली आहे, तर दुसऱ्या टर्फवर तत्काळ कारवाईचे आदेश आयुक्त राव यांनी दिले. तसेच,

logo
marathi.freepressjournal.in