Thane : १५ जूनपासून महापालिका शाळांचे शैक्षणिक वर्ष प्रारंभ; प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे होणार उत्साहात स्वागत

ठाणे महानगरपालिकेच्या सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये सोमवार, दि. १५ जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात येणार आहे.
Thane : १५ जूनपासून महापालिका शाळांचे शैक्षणिक वर्ष प्रारंभ; प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे होणार उत्साहात स्वागत
Thane : १५ जूनपासून महापालिका शाळांचे शैक्षणिक वर्ष प्रारंभ; प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे होणार उत्साहात स्वागत'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये सोमवार, दि. १५ जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात येणार आहे. शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरावा यासाठी महापालिकेच्या वतीने विशेष ‘शाळा प्रवेशोत्सव’ साजरा करण्यात येणार असून विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, फुले आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत केले जाणार आहे.

प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आकर्षण निर्माण करणे, शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण तयार करणे तसेच पालकांचा सहभाग वाढविणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

या निमित्ताने महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, शिक्षण विभागातील कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी विविध शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्य तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे.

Thane : १५ जूनपासून महापालिका शाळांचे शैक्षणिक वर्ष प्रारंभ; प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे होणार उत्साहात स्वागत
Thane : महापालिकेची पहिली CBSE बोर्डाची शाळा खारेगावमध्ये; ८ जूनपासून शाळेला सुरुवात होणार - आयुक्त सौरभ राव

नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले असून शाळा परिसर आकर्षक सजावटीने सजविण्यात येणार आहे. काही शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, स्वागतगीते आणि विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनही देण्यात येणार आहे.

प्रवेशोत्सव यशस्वी करण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने सर्व शाळांना आवश्यक सूचना दिल्या असून प्रत्येक विद्यार्थ्याचे हसतमुखाने स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होईल

विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी, शाळेतील पहिला दिवस आनंददायी ठरावा आणि शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल. १५ जून रोजी होणाऱ्या प्रवेशोत्सवामुळे महापालिका शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साह, आनंद आणि स्वागताच्या वातावरणात होईल, असा विश्वास महापालिकेच्या उपायुक्त डॉ. मिताली संचेती आणि शिक्षणाधिकारी शेषराव बढे यांनी व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in