ठाण्यात घर खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी; १७ एप्रिलपासून MCHIचे प्रॉपर्टी प्रदर्शन

एमसीएचआय आहे, तर भरोसा आहे, चला ठाणे ही टॅगलाईन घेऊन क्रेडाई एमसीएचआय ठाणे यांच्या वतीने २३ वे रिअल इस्टेट आणि हाऊसिंग फायनान्स एक्स्पो - प्रॉपर्टी प्रदर्शन २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.
ठाण्यात घर खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी; १७ एप्रिलपासून MCHIचे प्रॉपर्टी प्रदर्शन
ठाण्यात घर खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी; १७ एप्रिलपासून MCHIचे प्रॉपर्टी प्रदर्शन
Published on

ठाणे : एमसीएचआय आहे, तर भरोसा आहे, चला ठाणे ही टॅगलाईन घेऊन क्रेडाई एमसीएचआय ठाणे यांच्या वतीने २३ वे रिअल इस्टेट आणि हाऊसिंग फायनान्स एक्स्पो - प्रॉपर्टी प्रदर्शन २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन १४ ते १९ एप्रिल दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत बाळकुम येथील दोस्ती वेस्ट काऊंटी येथे पार पडणार आहे.

या प्रदर्शनात ठाणे आणि मुंबई उपनगरातील २५ हजारांहून अधिक बांधकाम व्यावसायिक, राष्ट्रीयकृत व सहकारी बँका तसेच विविध वित्तीय संस्थांचा सहभाग असणार आहे. त्यामुळे ठाणेकरांना गृहखरेदीसाठी विविध पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून परवडणाऱ्या व पसंतीच्या घराची निवड करावी, असे आवाहन क्रेडाई एमसीएचआय ठाणेचे अध्यक्ष सचिन मिरानी यांनी केले आहे.

ठाण्यात घर खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी; १७ एप्रिलपासून MCHIचे प्रॉपर्टी प्रदर्शन
MMRDAचा शिलकीचा अर्थसंकल्प; ४८,०७२.५७ कोटींचा अर्थसंकल्प सादर, विकास प्रकल्पांसाठी ८७ टक्के तरतूद

या तीन दिवसांच्या प्रदर्शनात परवडणारी घरे, लक्झरी प्रॉपर्टी, व्यावसायिक कार्यालये, सेकंड होम, सीनिअर सिटीझन होम्स तसेच विविध हाऊसिंग फायनान्स कंपन्या आणि बँकांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. ठाण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक जसे जितेंद्र मेहता, अजय आशर, सचिन मिरानी, फैयाज विराणी, जय वोरा, मंथन मेहता, मनीष खंडेलवाल, राजू वोरा, अमरसिंग ठाकूर, मनिष देढिया, हिरानंदानी, जगदाळे ग्रुप, केणी ग्रुप, विहंग ग्रुप, दोस्ती, लोढा आदींच्या सहभागामुळे ठाणेकरांचे घराचे स्वप्न साकार होत आहे. नुकतेच केंद्र सरकारने रेपो रेट आणि रेडी रेकनर दर स्थिर ठेवल्याने एमसीएचआयने समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्राला चालना मिळणार असून ठाण्याच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वासही मिरानी यांनी व्यक्त केला.

शहराच्या विकासाला वेग

ठाणे शहरात मेट्रोचे वाढते जाळे, रिंग रूट रेल्वे, कोस्टल रोड, ठाणे-बोरिवली बोगदा, नमो गार्डन यांसारख्या प्रकल्पांमुळे शहराच्या विकासाला वेग आला आहे. तसेच अत्याधुनिक मंदिरे, नाट्यगृहे, शॉपिंग मॉल्स यामुळे ठाण्याचे आकर्षण वाढत आहे. क्लस्टर डेव्हलपमेंट, एसआरए, बीएसयूपी यांसारख्या प्रकल्पांना चालना मिळत असताना, गगनचुंबी इमारती, सांडपाणी व मलनिस्सारण व्यवस्था, सौरऊर्जा, पार्किंग प्लाझा आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा यावरही भर देण्यात येत आहे.

ठाण्यात घर खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी; १७ एप्रिलपासून MCHIचे प्रॉपर्टी प्रदर्शन
Mumbai : पायाभूत प्रकल्पांसाठी FD मोडून १२ हजार कोटींची तरतूद; उदय सामंत यांची माहिती

गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध

या एक्स्पोमध्ये एका वीकेंडमध्ये उत्कृष्ट सौदे आणि गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होतील, असे मानद सचिव फैयाज विराणी यांनी सांगितले. ठाणे एमएमआरमधील पसंतीचे ठिकाण बनले असून, या प्रदर्शनाद्वारे त्याचा भाग होता येईल, असे एक्स्पो समितीचे अध्यक्ष विभव बोरकर म्हणाले. पहिले घर असो किंवा आलिशान टॉवरमधील फ्लॅट ठाणे हा सर्वोत्तम पर्याय आहे, असे मानद खजिनदार जय वोरा यांनी नमूद केले. घरमालकीच्या संकल्पनेचा उत्सव आम्ही साजरा करत आहोत, असे युवा शाखेचे अध्यक्ष निमित मेहता यांनी सांगितले.

अर्थव्यवस्था १५० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट

'ठाणे व्हिजन २०३०' अंतर्गत शहराला स्मार्ट, शाश्वत आणि राहण्यायोग्य बनवण्याचा मानस आहे. जीवनमान उंचावणे, आर्थिक वाढ आणि पायाभूत सुविधा सुधारणा यावर भर देण्यात येत असून, २०३० पर्यंत ठाण्याची अर्थव्यवस्था १५० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. ठाणे हे उपनगरातून स्वयंपूर्ण शहरी केंद्राकडे झेपावत असताना, हे प्रॉपर्टी प्रदर्शन शहराच्या झपाट्याने होत असलेल्या विकासाचे प्रतीक ठरत आहे.

logo
marathi.freepressjournal.in