Thane : शिंदे-उद्धव सेना आरोग्य केंद्रावरून आमने­सामने; दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्कीसह हाणामारी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातील ज्ञानेश्वरनगर परिसरात आरोग्य केंद्र उभारण्याच्या मुद्द्यावरून गुरुवारी तणाव निर्माण झाला.
Thane : शिंदे-उद्धव सेना आरोग्य केंद्रावरून आमने­सामने; दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्कीसह हाणामारी
Thane : शिंदे-उद्धव सेना आरोग्य केंद्रावरून आमने­सामने; दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्कीसह हाणामारी
Published on

ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातील ज्ञानेश्वरनगर परिसरात आरोग्य केंद्र उभारण्याच्या मुद्द्यावरून गुरुवारी तणाव निर्माण झाला. नाना-नानी पार्कच्या जागेवर आरोग्य केंद्र उभारण्यास विरोध करत शहाजी खुस्पे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले, तर शिंदे सेनेने या प्रकल्पाला पाठिंबा दर्शवला. या वादातून दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्की आणि हाणामारी झाली.

Thane : शिंदे-उद्धव सेना आरोग्य केंद्रावरून आमने­सामने; दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्कीसह हाणामारी
Thane : भ्रष्ट व्यवस्थेचे बळी; मुरबाडजवळ दोन गाड्यांची धडक, ११ जण जागीच ठार

वागळे इस्टेट परिसरातील ज्ञानेश्वरनगर हा भाग शिंदे सेनेचा बालेकिल्ला मानला जातो. येथील उद्यान पूर्वी नाना-नानी पार्क म्हणून ओळखले जात होते. स्थानिकांच्या मते, ही जागा लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची असून ती कायम ठेवावी. मात्र, त्याच ठिकाणी आयुष्यमान आरोग्य केंद्र उभारण्याचा प्रस्ताव पुढे आल्याने वाद निर्माण झाला आहे. शहाजी खुस्पे यांनी आरोप केला की, पार्कच्या जागेवर आरोग्य केंद्र उभारण्याचा निर्णय चुकीचा असून परिसरात आधीच शौचालय असल्याने आरोग्य केंद्रासाठी ही जागा अयोग्य आहे. पर्यायी जागा निवडावी, अशी मागणी त्यांनी यापूर्वी केली होती. स्थानिक नागरिकांनीही यासाठी पाठिंबा दर्शवत आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर संजय केळकर यांनीही उद्यान कायम ठेवण्याची भूमिका घेत प्रशासनाला पर्यायी जागा शोधण्याच्या सूचना दिल्या होत्या. काही दिवस परिस्थिती शांत होती. मात्र गुरुवारी आरोग्य केंद्रासाठी कंटेनर घेऊन आलेले वाहन परिसरात पोहोचताच उद्धव सेनेचे कार्यकर्ते व नागरिकांनी ते अडवले. त्यानंतर शिंदे सेनेचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमा झाले आणि दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वादावादी झाली. याचे रूपांतर हाणामारीत झाले.या घटनेत महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. घोषणाबाजी आणि धक्काबुक्कीमुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. उद्धव सेनेकडून आरोप करण्यात आला की, शिंदे सेनेच्या काही महिला कार्यकर्त्या बाहेरून आणण्यात आल्या होत्या.

या वेळी शिंदे सेनेचे स्थानिक नगरसेवक अनिल भोर, राम रेपाळे तसेच माजी नगरसेवक अशोक वैती उपस्थित होते. घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, गदारोळानंतरही आरोग्य केंद्राचा कंटेनर संबंधित ठिकाणी ठेवण्यात आला आहे.

या ठिकाणी पूर्वी कचरपट्टी होती. गुंड व मद्यपींचा त्रास वाढला होता. महिला असुरक्षित वाटत होत्या. त्यामुळे जागा स्वच्छ करून येथे आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी करण्यात आली. सुमारे २५ हजार रहिवाशांना याचा लाभ होणार असून नियमानुसारच काम सुरू आहे.

अनिल भोर

येथे मुलांसाठी गार्डन होते. चुकीच्या ठिकाणी आरोग्य केंद्र उभारले जात आहे. प्रशासनाला हाताशी धरून हा निर्णय पुढे रेटला जात आहे. त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन करत आहोत.

- शहाजी खुस्पे

logo
marathi.freepressjournal.in