चार शिक्षकांविरोधात गुन्हे दाखल; उल्हासनगरात निवडणूक कामात बेपर्वाई

उल्हासनगर महानगरपालिका हद्दीत निवडणूक प्रक्रियेदरम्यान गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार उघडकीस आला असून, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) चार म्हणून नियुक्त शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चार शिक्षकांविरोधात गुन्हे दाखल; उल्हासनगरात निवडणूक कामात बेपर्वाई
चार शिक्षकांविरोधात गुन्हे दाखल; उल्हासनगरात निवडणूक कामात बेपर्वाई'एआय' ने बनवलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिका हद्दीत निवडणूक प्रक्रियेदरम्यान गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार उघडकीस आला असून, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) चार म्हणून नियुक्त शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चार शिक्षकांविरोधात गुन्हे दाखल; उल्हासनगरात निवडणूक कामात बेपर्वाई
Thane : शिक्षकांवर BLO कामाचा बोजा; ऐन परीक्षेच्या काळात शिक्षक त्रस्त

सहाय्यक आयुक्त विशाल कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १४१ उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात नियुक्त करण्यात आलेल्या या अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात मोठी कसूर केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

उपमुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य निवडणूक यंत्रणा यांच्या निर्देशानुसार मतदार यादी व शुद्धीकरणासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना एसआयआर मॅपिंग, अस्पष्ट छायाचित्रांची पडताळणी आणि दुबार मतदार वगळण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी २० टक्क्यांपेक्षाही कमी काम पूर्ण केल्याचे निदर्शनास आले.

चार शिक्षकांविरोधात गुन्हे दाखल; उल्हासनगरात निवडणूक कामात बेपर्वाई
सामूहिक कॉपीप्रकरणी १०३ शिक्षक निलंबित; दहावी-बारावी परीक्षेदरम्यान गोपनीयतेचा भंग केल्याने सर्वात मोठी कारवाई

या चार शिक्षकांना उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्याकडून वारंवार कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. तरीही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. तसेच निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाच्या बैठकींनाही ते अनुपस्थित राहिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेत शिस्त, जबाबदारी आणि पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाने यापुढे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कडक भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in