राशीभविष्य

ऑगस्ट महिना कसा जाईल? बघा मिथुन आणि कर्क राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे ऑगस्ट महिना? जाणून घ्या...

नवशक्ती Web Desk

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण

मिथुन रास

उत्साहवर्धक कालावधी

मिथुन राशीचे चिन्ह म्हणजे स्त्री व पुरुष आहे किंवा पती-पत्नीचे जोडपे आहे पाश्चात त्यांच्या मते दोन जुळी  अर्भके या राशीचे चिन्ह मानतात  त्यामुळे अलगलभता सुचित होते.पती व पत्नीचे जोडपे त्यात पुरुषाच्या हातात शारीरिक सामर्थ्यदर्शक गदा हे आयुध आहे तर स्त्रीच्या हातामध्ये विणा हे संगीत कलादर्शक तंतुवाद्य आहे त्यामुळे शारीरिक बळ दर्शक आहे गदा नावाचे आयुध आहे स्त्रीच्या हातातील वीणा हे संगीत व प्रेम याचे प्रतीक आहे ही राशी वंध्या आहे  या राशीचे तत्व वायू आहे या राशीचे दिशा भाव बलवान लग्नात होते तसेच ही रास रात्री बली आहे.

शिक्षण - शिक्षण क्षेत्रातील टेक्निकल विभागामध्ये चांगले शिक्षण मिळू शकते त्याचबरोबर त्याच्यात यश सुद्धा मिळू शकते इतरत्र कोणत्याही क्षेत्रांमध्येच यश मिळेलच पण टेक्निकल क्षेत्रामध्ये उल्लेखनीय यश प्राप्त होऊ शकते फक्त अभ्यास करताना मला एकाग्रत ठेवा शिक्षण क्षेत्रासाठी ग्रहमान चांगले आहे अभ्यास करताना सातत्य हवे अति आत्मविश्वास नडू शकतो कला व क्रीडा क्षेत्रात उत्तम यश प्राप्त होईल परंतु त्यासाठी थोडे सरावाकडे लक्ष देणे आवश्यक आहे परदेशासंबंधी शिक्षणात योग्य प्रयत्नांनी यश लाभू शकते. 

पारिवारिक - कुटुंब परिवारातील वातावरण चांगले राहील खेळीमेळीचे वातावरण असेल घरातील मुलांच्या विषयी जास्तीच्या जबाबदाऱ्या स्वीकारावा लागण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे खर्चाचे प्रमाण सुद्धा वाढू शकते कुटुंबातील सदस्यांच्या गरजा अथवा मागण्या पूर्ण करू शकाल आर्थिक दृष्टीने चांगले ग्रहमान आहे त्याप्रमाणे बचतही चांगली होऊ शकते मनोरंजनासाठी खर्च होऊ शकतो त्याचप्रमाणे घरामध्ये भौतिक सुखाच्या खरेदीसाठी सुद्धा खर्च होईल. कुटुंब परिवारातील महिलांच्या कडून जास्तीची खरेदी होऊ शकते.

 नोकरी व्यवसाय धंदा - आपल्यासारख्या बुद्धीच्यातुर्यवादी व्यक्तींसाठी उत्साहवर्धक कालावधी असणार आहे आपल्या कार्यक्षेत्रात आपण यश प्राप्त करू शकाल नोकरी करणाऱ्या जातकांना चांगला कालावधी आहे चालू नोकरी त्यांचे  वेतन वाढीचे तसेच बढतीचे योग आहेत मात्र जबाबदारी नव्याने स्वीकारावी लागेल नोकरीतून  परदेश गमनाचे  योग  घटीत होत आहेत.  परदेश वारी होऊ शकते. ज्या जातकांचा नवीन नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न चालू आहे अशा जातकांच्या प्रयत्नांना यश मिळेल घरातील तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील तसं बघितलं तर सदरचा कालावधी हा संमिश्र घटनांचा ठरू शकतो काही वेळा ऊन तर कधी सावली याचा अनुभव मिळेल कार्यक्षेत्रात चढउतार होतील पण त्याने डगमगून जाण्याची गरज नाही यश मिळतच राहील फक्त आपण शिस्त  बद्धतेने कार्य मग्न राहणे गरजेचे आहे कुटुंब परिवारात मंगल कार्य घडू शकते कुटुंब परिवारातील शिक्षण घेणाऱ्या मुला मुलींच्या कडून त्यांच्या शैक्षणिक प्रगती पर वार्ता समजतील व्यापार व्यवसायात आर्थिक व्यवहार सावधतेने करावेत तसेच शेअर मार्केट सट्टा बाजार जुगार सदृश्य व्यवहार फसवणूक होण्याची शक्यता दाट आहे.

 शुभ दिनांक - 6,7,9,16,11,14,19,24,25,26

 अशुभ दिनांक - 2,5,13,16,18,21,23,30,31

कर्क रास

वादविवाद सांभाळा

कर्क राशीचे चिन्ह जलचर असलेला प्राणी खेकडा हा आहे. प्रबलांशी नमते घेणे आणि दुर्बलांवर आक्रमण करणे हा त्याचा  स्थायीभाव आहे किंवा त्याच्या स्वभावातील प्रमुख गुण आहे खेकडे प्रमाणे ज्यांची पावले सरळ न पडता एकमेकांच्या पुढे पडत असल्याने अशा व्यक्ती चालता चालता रस्त्याच्या किंवा वाटेच्या एका बाजूस गेलेल्या दिसतात गुप्तपणे टेहळणी करून सावध पकडणे व पकडलेल्या समाजाचे तुकडे तोडणे या खेकड्याच्या गुणधर्म प्रमाणे नैसर्गिक गुण आढळतात कर्क राशी ही बहुप्रसव राशी आहे जलतत्त्व आहे दिशा भाव बल  कर्क राशीचे चतुर्थ स्थान आहे हि राशी रात्री बलवान असते.

शिक्षण - शिक्षण क्षेत्रातील सर्वच विभागांसाठी ग्रहमान अनुकूल आहे स्वतःची कशी प्रगती करावी याचे आत्मज्ञान आपणास असणार आहे त्यामुळे आपले प्रयत्न योग्य दिशेने होऊन आपण यशस्वी व्हाल कला व क्रीडा क्षेत्रात अनुकूलता असणार आहे चांगल्या चांगल्या संधी मिळतील आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी अवश्य मिळेल परदेशासंबंधी योग्य प्रयत्नांची आवश्यकता आहे योग्य दिशेने केलेल्या प्रयत्नांना चांगले यश मिळेल कोणत्याही परिस्थितीमध्ये गडबडीत अथवा काही गर्दीमध्ये निर्णय घेऊ नका ते चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पारिवारिक - आपल्या कुटुंब परिवारातील व्यक्ती अथवा सदस्य काही ना काही कारणाने आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या टाळण्याचा प्रयत्न करू शकतात त्यामुळे घरामध्ये आपल्याला जास्त लक्ष द्यावे लागणार आहे वेळेला स्वतः जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील जबाबदाऱ्या वाढू शकतात स्वतः पुढाकार घेणे अपुरीहारी ठरेल आर्थिक दृष्ट्या ग्रहमान अनुकूल आहे त्यामुळे घरातील सदस्यांच्या मागण्या आपण योग्य तऱ्हेने पूर्ण करू शकाल खर्च वाढण्याचा संभव आहे अनावश्यक खर्चाला कात्री लावा त्याचप्रमाणे घरातील व्यक्तींशी सुसंवाद साधावा लागणार आहे आपल्या हुशारीने घरातील वाद विवाद आपण सोडवू शकाल त्यामुळे कुटुंबात एकोपाराहून कुटुंब परिवारात शांतता नांदेड अध्यात्मक तसेच धार्मिक  गोष्टींमध्ये आपण विशेष रस घ्याल.

नोकरी व्यवसाय धंदा - आपल्या कार्यक्षेत्रात नोकरी व्यवसाय धंदा तसेच कुटुंब परिवारात उत्साही वातावरण असणार आहे नोकरीत अनुकूलता व्यापलेली अनुभवण्यास मिळेल वरिष्ठांचे व बरोबरील लोकांचे सहकार्य मिळाल्या मुळे आनंदाने आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाल आपला आत्मविश्वास वाढेल अति आत्मविश्वासाने अथवा अति उत्साहाने इतरांचा अपमान करू नका वरिष्ठांशी विनयशीलता ठेवा कुटुंब परिवारात लहान सहान कारणांवरून होणारे वाद विवाद प्रत्कर्षाने टाळा.नवीन कामे नव्या उमेदीने हाती घ्याल. सार्वजनिक जीवनात तुमच्या सत्तेचा आणि अधिकाराचा वापर करू शकाल. परंतु आपल्या अधिकार कक्षेतच आपले कार्य पूर्ण करणे हिताचे ठरेल. त्याचप्रमाणे सरकारी कायदे कानून यांचे उल्लंघन करू नका. जवळचे तसेच दूरचे प्रवास योग आहेत प्रवास फायदेशीर ठरतील प्रवास करताना वाहनाच्या वेगावरती नियंत्रण अति आवश्यक आहे दुखापती पासून जपा काहींना वेदनायुक्त शारीरिक व्याधी डोके वर काढेल आपणास जास्त काम करावे लागल्यामुळे  विश्रांतीची गरज भासेल आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. व्यवसायिक पातळीवरची भरपूर प्रगती होईल काही वेळेस त्रासाचे प्रसंग उद्भवू शकतात तसेच खर्चाचे प्रमाणे वाढू शकते तारतम्याने खर्च करा. प्रयत्नांना यश मिळेल. 

शुभ दिनांक - 9,14,17,24,25,26,28

अशुभ दिनांक - -2,5,13,16,18,21,23,30,31

तरुणांनी राष्ट्र उभारणीसाठी समर्पित व्हावे; पंतप्रधानांचे आवाहन

डोवाल यांचे धोरण कणखर; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गौरवोद्गार; लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान

Friendship Day 2026 : "मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा"; तुमच्या बेस्ट फ्रेंड्सना पाठवा खास शुभेच्छा संदेश

आजचे राशिभविष्य, २ ऑगस्ट २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Sunday Special : एअर फ्रायरमध्ये चिकन बनवायचंय? आधी 'या' महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या