आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, ५ डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, December 5, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

Swapnil S

मेष - मनोबल उत्तम राहील. आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात नवीन घटना घडू शकतात, पण त्या सकारात्मकच असतील. प्रगती, उन्नती होईल.

वृषभ - प्रेमात अनुकूल प्रतिसाद मिळेल. यशाचे प्रमाण वाढते राहील. व्यावसायिक जुनी येणी येतील. अर्थ मान उंचावेल. मनाप्रमाणे खर्च करू शकाल. प्रवास करू शकाल.

मिथुन - कुटुंबात मंगलकार्याची नांदी घडेल. मुलांना अपेक्षित यश मिळेल. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चांगला वाव मिळेल. जीवनसाथीचे उत्तम सहकार्य लाभेल.

कर्क - प्रॉपर्टीची कामे मार्गी लागू शकतील. गृहसौख्य उत्तम. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. व्यवसायात उलाढाल वाढून नफ्याचे प्रमाण वाढेल.

सिंह - धनप्राप्तीचे प्रभावी योग, अनेकानेक मार्गाने धन आगमन होऊ शकते. व्यावसायिक जुनी येणी देखील येतील. प्रगती करू शकाल.

कन्या - उत्साहाने आणि आनंदाने आपल्या पुढील कामे पूर्ण करू शकाल. आत्मविश्वासात वाढ होऊन इतरांना आपली मतं पटवून देऊ शकाल. जवळचे प्रवास घडू शकतात.

तुळ - भरभराट होईल. मनासारख्या घटना घडतील. इच्छापूर्तीचा दिवस. खर्चावर थोडे नियंत्रण ठेवायला हवे. धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल. प्रेमात यश संपादन कराल.

वृश्चिक - आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती होईल. नोकरीत आपल्याला अधिकार वाढवून मिळतील. पण जबाबदारीही वाढतील. धनलाभ देखील होण्याची शक्यता आहे.

धनु - पर्यटन किंवा कामानिमित्त प्रवास घडतील. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडतील. स्वभावात चिडखोरपणा डोकावू शकतो. क्रोधावर नियंत्रण हवे.

मकर - आर्थिक व्यवहार सावधानतेने करण्याची गरज. उसनवारी करू नका. अनावश्यक खर्च टाळा. कोणाच्याही बोलण्यात येऊ नका. वादविवादापासून दूर राहा.

कुंभ - जमिनीच्या व्यवहारात अथवा स्थायी संपत्तीच्या व्यवहारात सावधानता बाळगा. त्यामुळे नुकसान टळेल. पारिवारिक कार्यक्रमात पुढाकार घ्याल.

मीन - जीवनसाथीच्या मतास प्राधान्य दिल्यास आपली महत्त्वाची कामे पार पाडू शकाल. व्यवसायात अंदाज बरोबर ठरतील. धाडसी निर्णय घेतले जातील.

LPG सिलिंडर बुकिंग आता आणखी सोपं! व्हॉट्सॲप, मिस्ड कॉलपासून ॲपपर्यंत अनेक सुविधा उपलब्ध

मध्यपूर्वेतील संघर्षादरम्यान भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना दिलासा; ३० दिवसांची व्हिसा मुदतवाढ, ओव्हरस्टे दंडही माफ

Mumbai : लोकल प्रवाशांसाठी सूचना; उद्या 'या' रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक, वाचा वेळापत्रक

एका दिवसात ४५ हजार गॅस सिलिंडरचे वितरण; ठाणे शिधावाटप विभागाचा दावा; घरगुती पुरवठा सुरळीत, व्यावसायिकवर तात्पुरती मर्यादा

मुंबईकरांनो सावधान, यंदा पावसाळ्यात समुद्राला उधाण; २४ दिवस समुद्रात उसळणार मोठ्या लाटा