मेष - आज आपल्या शब्दास उचित प्राधान्य मिळेल. मुला मुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील. एखादे महत्त्वाचे काम होईल. प्रवासाची शक्यता.
वृषभ - सामाजिक कार्यात सक्रिय योगदान द्याल मानसन्मान प्रतिष्ठा लाभेल. आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. जुने मित्र भेटल्यामुळे आनंदी राहाल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
मिथुन - समाजातील मान्यवर व्यक्तींच्या ओळखी वाढतील त्याचप्रमाणे त्यांचे मार्गदर्शन लाभून मदत मिळू शकते. गुरुजनांचे आशीर्वाद लाभतील. धार्मिक तेकडे कल राहील.
कर्क - आपल्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील चांगले अनुसंधान साधून महत्त्वाची कामे करता येतील. कर्तृत्वाला योग्य सन्मान मिळेल. आरोग्याकडे लक्ष ठेवणे हितकारक राहील.
सिंह - जिद्दीने एखादे महत्त्वाचे काम हातावेगळे करण्यात यश मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेता येतील.आत्मविश्वासात वाढ होईल. कामात गती येईल.
कन्या - आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळे चिंता कमी होतील. मात्र कार्यमग्न राहण्याची आवश्यकता कामाचा कंटाळा करू नका.
तुळ - दिवसातला बराचसा वेळ मित्रमंडळींच्या समवेत मौजमजेत व मनोरंजना मध्ये व्यतीत होईल. नवीन ओळखी होतील आर्थिक चिंता मिटेल.
वृश्चिक - हाती घेतलेल्या कामात यश मिळेल आपले आवडते छंद जोपासता येतील. एखादी सुवर्णसंधी हाती येऊ शकते.
धनु - जुनी येणी येतील कामात यशस्वी व्हाल घरातील व्यक्तींची काळजी घ्या. त्याचबरोबर स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका आजारांवर वेळीच उपाययोजना करा.
मकर - आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. कुटुंबातील ज्येष्ठांच्या प्रकृतीकडे पुरेसे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. महत्त्वाची कामे यशस्वी होतील.
कुंभ - सार्वजनिक कार्यात तसेच धार्मिक कार्यात दानधर्म कराल. जवळच्या एखाद्या धार्मिक पवित्र स्थळी सहकुटुंब सहपरिवार भेट देण्याचा योग संभवतो.
मीन - मोठे मनसुबे आखाल. गूढगोष्टींचे आकर्षण राहील धार्मिकते कडे कल राहू शकतो. आर्थिक परिस्थिती उंचावेल. दानधर्म करणे कर्तव्य समजाल.