आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १ मे २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, May 1, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आजचा दिवस आपल्याला अनेक दृष्टीने अनुकूल ठरेल मानसिक प्रसन्नता लाभेल. दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी चांगला दिवस. अपेक्षित गाठीभेटी होतील.

वृषभ - आपल्या कार्यक्षेत्रात तसेच नोकरीच्या ठिकाणी तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. आरोग्य चांगले राहून आर्थिक लाभ संभवतो.

मिथुन - व्यवसाय-धंद्यात अचानक धनलाभ संभवतो जुनी आर्थिक येणी येतील. परिवारातून आनंददायक वार्ता मिळतील. कुटुंबात एखादे धार्मिक अनुष्ठान घडू शकेल.

कर्क - काही अप्रिय निर्णय स्वीकारावे लागण्याची शक्यता आहे मानसिक अस्वस्थता जाणवेल. कौटुंबिक सुख मिळेल. कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न अथवा समस्या संपुष्टात येतील.

सिंह - रोजची दैनंदिन कामे सुरळीत होतील. एखादे काम अर्धवट राहू शकते परंतु ते पूर्ण करण्यासाठी इतरांची मदत मिळेल आर्थिक बाब चांगली राहील. मित्र मंडळ यांच्या समवेत वेळ जाईल.

कन्या - मानसिक अस्वस्थता राहण्याची शक्यता आहे. कामांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात स्वभावात चिडखोरपणा येण्याची शक्यता असल्यामुळे शांत राहणे गरजेचे आहे.

तुळ - आपल्या बोलण्याने अथवा वागण्याने आपण इतरांची मने जिंकू शकाल. महत्त्वाची कामे हातावेगळी करू शकाल तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जुन्या गुंतवणुकीतून धनलाभ होऊ शकतो.

वृश्चिक - हातात घेतलेली दैनंदिन कामे यशस्वी होतील. कार्यात गतिशीलता असेल कार्यमग्न राहाल मात्र इतरांवर कोणतीही महत्त्वाची जबाबदारी सोपवू नका.

धनु - आपल्या अवतीभवती मनस्ताप दायक घटना घडण्याची शक्यता आहे जाणीवपूर्वक लहान मोठ्या गोष्टीमुळे होणारे वादविवाद टाळावेत कामाचा ताण जाणवेल.

मकर- जुने मित्रमंडळी भेटल्यामुळे वेळ कसा जाईल हे समजणार नाही जुन्या आठवणीत रमून जाल मित्रमंडळीं समावेत एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन करू शकाल वैवाहिक सौख्य लाभेल.

कुंभ - काही अनावश्यक गोष्टीत तुमचा वेळ व पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण आवश्यक. कुटुंबातील सदस्यांच्या मागण्या वाढण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण आवश्यक.

मीन - कुटुंबामध्ये जास्ती वेळ द्यायला हवा. घरातील मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल घरगुती समस्या सोडवण्यात पुढाकार घ्याल अर्धवट राहिलेले एखादे काम पूर्ण करू शकाल.

कमी पाण्याची पिके घ्या; शेती खात्याचे शेतकऱ्यांना आवाहन

आसाममधील चहाच्या मळ्याचा ‘टी टुरिझम’वर भर; ग्राहकांना चहाच्या संस्कृतीशी पुन्हा जोडण्याचा प्रयत्न

‘गृह’ अन् ‘महसूल’ खाते कोणाकडे हे माहिती आहे का? परिवहन मंत्री सरनाईक यांचा आमदार मेहतांना टोला

मुंबईत गंभीर गुन्हेगारीत वाढ; गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खुनाच्या गुन्ह्यांमध्येही मोठी वाढ

Navi Mumbai : एनआरआय फ्लेमिंगो तलावावर पर्यटकांची झुंबड; DPS, TSC वेटलँड्स पुनर्जीवित करा, पर्यावरणवाद्यांची राज्य सरकारकडे मागणी