आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, ११ जुलै २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, July 11, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष : ज्येष्ठांचा सल्ला घ्या, त्याने आपणास फायदा होणार आहे. काही अनुकूल घटना घडतील मुलांना अपेक्षित यश मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील. जोडीदाराची थोडे सबुरीने घ्या.

वृषभ : व्यवसायामध्ये मोठी उलाढाल होईल. नोकरीमध्ये जरा प्रश्न उत्पन्न होणार आहेत. सहकारी मदत करतील, त्यामुळे कामाचा ताण कमी जाणवणार आहे. विविध कामांमध्ये यश मिळणार आहे.

मिथुन : नवीन प्रकल्पाचे काम हाती घ्याल, त्यासाठी मात्र नियोजन नीट करावे. नोकरीत प्रगती होईल. कर्ज वसुली होणार आहे. आर्थिक आवक चांगली राहील. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील.

कर्क : शेतीच्या कामासाठी वेळ द्या. व्यवसायातील तुमचा अंदाज खरे होतील. जोडीदाराशी मधुर संबंध राहतील. घेतलेले काम तडीस नेण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न आपण करा.

सिंह : सातत्याने काम करत आहात. काम एके कामकरण्यापेक्षा थोडासा मनावरील ताणं कमी करण्यासाठी दक्ष राहा. थोडा आराम करा, व थोडा मनाला विरंगुळा वाटेल असे काही काम करा.

कन्या : आपणास आज काम जास्त आहे. नोकरीत जबाबदारी वाढणार आहे .आर्थिक आवक चांगली राहणार आहे. पण खर्च पण वाढतील. मनस्ताप होऊ शकतो. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

तुळ : नोकरीमध्ये प्रगती होणार आहे. समाजसेवेसाठी पुढाकार घ्याल. व्यवसायात मोठी गुंतवणूक करू नका. जवळचे लोक नातेवाईक मित्र कोणी भेटण्याची शक्यता. काहींना मानसन्मान मिळेल. लाभ होतील.

वृश्चिक : आपल्या कामामध्ये ओळखीचा लोकांचा फायदा करून घ्या. काही व्यक्तींना जवळपास प्रवास होण्याची शक्यता आहे. प्रवासात अनोळखी व्यक्तीशी वाद घालू नका.

धनु : नोकरी-व्यवसायात एखादी महत्वाची बातमी कळणार आहे. व्यवसायात विक्री चांगली होईल. जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. प्रवास होतील. प्रवासामध्ये दानधर्म होण्याची शक्यता

मकर : स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ नका. शेतीचे मध्ये महत्वाची कामे कराल. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. जोडीदाराबरोबर कामाचे नियोजन करा.जोडीदाराचे सहाय्य महत्त्वाचे ठरणार आहे.

कुंभ : उधारी उसनवारी चे काम करूच नका .नोकरीमध्ये काम वाढण्याची शक्यता आहे. प्रवास होईल, प्रवासात महत्त्वाचे कामे होतील. आपल्या मनाप्रमाणे इतर लोक वागणार नाहीत हे लक्षात घ्या.

मीन : आपली कामे पूर्ण होतील. नोकरीत आपले मत विचारात घेतले जाणार आहे.वरिष्ठ आणि सहकारी तुम्हाला समजून घेतील. कामामध्ये उत्साह राहणार आहे. पण प्रकृती थोडी अस्वस्थ असेल.

डेटा सेंटरची दुसरी काळीकुट्ट बाजू

Kitchen Tips : बटाटा-कांदा भजी बनवताना 'या' चुका टाळा; प्रत्येक वेळी येईल परफेक्ट कुरकुरीतपणा

फक्त कांदा, ब्रेड आणि चीज... ५ मिनिटांत तयार होईल खमंग तवा सॅण्डविच; पावसाळ्यात नक्की ट्राय करा

Kitchen Tips : कोथिंबिरीचे देठ फेकून देता? 'या' सोप्या टिप्सने वाढवा प्रत्येक पदार्थाची चव

गरोदरपणात समांथा रुथ प्रभूची उडाली झोप; 'इन्सोम्निया' म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या कारणं आणि उपाय