मेष - ज्येष्ठांचा सल्ला घ्या, त्याने आपणास फायदा होणार आहे. काही अनुकूल घटना घडतील मुलांना अपेक्षित यश मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील. जोडीदाराची थोडे सबुरीने घ्या.
वृषभ - व्यवसायामध्ये मोठी उलाढाल होईल. नोकरीमध्ये जरा प्रश्न उत्पन्न होणार आहेत. सहकारी मदत करतील, त्यामुळे कामाचा ताण कमी जाणवणार आहे. विविध कामांमध्ये यश मिळणार आहे.
मिथुन - एखाद्या नवीन प्रकल्पाचे काम हाती घ्याल, त्यासाठी मात्र नियोजन नीट करावे. नोकरीत प्रगती होईल. कर्ज वसुली होणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील.
कर्क - शेतीच्या कामासाठी वेळ द्या. व्यवसायातील तुमचा अंदाज खरे होतील. जोडीदाराशी मधुर संबंध राहतील. घेतलेले काम तडीस नेण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न आपण करा.
सिंह - आपण सातत्याने काम करत आहात. काम एके काम काम करण्यापेक्षा थोडासा मनावरील गाणं कमी करण्यासाठी दक्ष राहा. थोडा मनाला विरंगुळा वाटेल असे काही काम करा.
कन्या - आपणास आज काम जास्त आहे. नोकरीत जबाबदारी वाढणार आहे .आर्थिक आवक चांगली राहणार आहे. पण खर्च पण वाढतील. मनस्ताप होऊ शकतो. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
तुळ - नोकरीमध्ये प्रगती होणार आहे. समाजसेवेसाठी पुढाकार घ्याल. व्यवसायात मोठी गुंतवणूक करू नका. जवळचे लोक नातेवाईक मित्र कोणी भेटण्याची शक्यता. लाभ होतील.
वृश्चिक - आपल्या कामामध्ये ओळखीचा लोकांचा फायदा करून घ्या. काही व्यक्तींना जवळपास प्रवास होण्याची शक्यता आहे. प्रवासात अनोळखी व्यक्तीशी वाद घालू नका.
धनु - नोकरी-व्यवसायात एखादी महत्वाची बातमी आपणास कळणार आहे. व्यवसायात विक्री चांगली होईल. जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. प्रवास होती. प्रवासामध्ये दानधर्म होण्याची शक्यता.
मकर - स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ नका. शेतीचे मध्ये महत्वाची कामे कराल. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. जोडीदाराबरोबर कामाचे नियोजन करा.जोडीदाराचे सहाय्य महत्त्वाचे ठरणार आहे.
कुंभ - उधारी उसनवारी चे काम करूच नका .नोकरीमध्ये काम वाढण्याची शक्यता आहे. प्रवासात महत्त्वाचे कामे होतील. आपल्या मनाप्रमाणे इतर लोक वागणार नाहीत हे लक्षात घ्या.
मीन - आपली कामे पूर्ण होतील. नोकरीत आपले मत विचारात घेतले जाणार आहे.वरिष्ठ आणि सहकारी तुम्हाला समजून घेतील. कामामध्ये उत्साह राहणार आहे. पण प्रकृती थोडी अस्वस्थ असेल.