आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १२ ऑगस्ट २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, August 12 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - कामाचा वेग वाढणार नाही. आपल्याला आपला आत्मविश्वास वाढवण्याची जरुरी आहे. काम जास्त पडण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत वातावरण चांगले राहणार आहे.

वृषभ - आपल्या हातून चांगली रचनात्मक कामे होणार आहेत. महत्वाच्या कामामध्ये सातत्य राहील. विद्यार्थ्यांना चांगला दिवस. कोणत्याही कामात विलंब होत नाही. याकडे लक्ष द्यावे.

मिथुन - आपण आपल्या बुद्धिचातुर्याने आज काम करणार आहात. तरीसुद्धा कामात थोडे लक्ष देणे जास्त जरुरीचे आहे. शुभ ग्रह आपल्याला सहकार्य करणार आहेतच, निराश करणार नाहीत.

कर्क - शुभ ग्रहाच्या भ्र्मणामुळे आपली कामे वेगवान होतील. जर आपण कलाक्षेत्र साहित्य क्षेत्रात काम करत असाल तर मनासारख्या घटना घडतील. व्यापार-व्यवसायात अपेक्षित यश मिळेल.

सिंह - आपल्याला व्यापार व्यवसाय मध्ये यश येणार आहे. मिळकतीचे नवे प्रस्ताव समोर येतील. आर्थिक लाभ होणार आहे. कुटुंबामध्ये खेळीमेळीचे वातावरण राहणार आहे.

कन्या - आपले मनोबल चांगले राहणार आहे. समोर अनेक कामे दिसणार आहेत. एका वेळी एक काम करणे ईस्ट राहणार आहे. कामाच्या अनेक संधी समोर दिसणार आहे.

तुळ - आज विचारपूर्वक कामे करण्याची गरज आहे. कामे पूर्ण करताना अडचणी समोर दिसणार आहे. जुनी कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कोणतीही गुंतवणुक करू नका.

वृश्चिक - योग्य नियोजन आणि योग्य हालचाली यामुळे नवीन आशादायक चित्र समोर येणार आहे. आपणास मनोरंजनासाठी मित्रांसोबत बाहेर जाण्याची इच्छा असणार आहे.

धनु - शुभ ग्रहांची आपल्याला साथ राहणार आहे. नियमित व्यवहार चांगले होणार आहेत. व्यापार व्यवसाय चांगल्या प्रकारे गती घेणार आहे. प्रापंचिक समस्या चांगल्या तऱ्हेने सोडवाल.

मकर - सातत्याने काम केल्यामुळे काम मध्ये भरघोस यश येणार आहे. नियोजित कामे पूर्ण करणारा आहात. प्रवासाची शक्यता आहे. सामाजिक आणि धार्मिक कामांमध्ये मन रमणार आहे.

कुंभ - महत्त्वाचे काम करताना बारकाईने लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे. कुठल्याही महत्त्वाच्या कागदपत्रांवर नीट वाचूनच सह्या करा. योग्य व्यक्तीशी संपर्क आणि चर्चा करूनच महत्त्वाची कामे करा.

मीन - आपल्या विश्वास पात्र व योग्य व्यक्तीचा सल्ल्याचा महत्त्वाच्या कामात उपयोग करून घ्या. वादग्रस्त विषय टाळणे फार महत्त्वाचे आहे. लोकांचे योग्य संवाद साधणे हाच आपला योग्य मार्ग.

सुशिक्षित बेरोजगारांचा वाली कोण?

श्रावणात उपवासासाठी बनवा कुरकुरीत फराळी चिवडा! साबुदाणा, मखाणे अन् शेंगदाण्याची भन्नाट चव

Jharkhand Student Protest : भरती परीक्षांविरोधातील आंदोलन तीव्र; पोलिसांना धक्काबुक्की, ABVP चे ११० कार्यकर्ते ताब्यात

Mumbai-Pune Expressway : 'मिसिंग लिंक' उद्या ३ तास बंद; प्रवासाला निघण्यापूर्वी वाचा महत्त्वाची बातमी

IPL क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचाराचा आरोप