आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १२ डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, December 12, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - लहान-मोठे प्रवास घडतील. धार्मिक कार्याच्या माध्यमातून प्रवास होऊ शकता. देवपूजेत मन रमू शकते दानधर्म घडेल महत्त्वाची कामे पार पाडू शकाल.

वृषभ - आर्थिक आवक चांगली राहील यामुळे मन समाधानी राहील विविध मार्गांनी धनप्राप्ती होऊ शकते नोकरीत सामान्य परिस्थिती राहील फार अपेक्षा ठेवू नये.

मिथुन - नोकरी अनुकूल संधी मिळेल मनासारखी बदली होईल परंतु जबाबदारी मध्ये वाढ होऊ शकते तसेच कामाच्या स्वरूपातही बदल होईल गृहसौख्य चांगले राहील.

कर्क - भाग्याची चांगली साथ राहील आपले निर्णय अचूक ठरवून त्याचा फायदा अनुभवता येईल पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास घडू शकतात नोकरीत मात्र वादाचे प्रसंग येतील ते टाळा.

सिंह - आर्थिक आवक चांगली राहील यामुळे आपले नियोजन उत्तम होईल महत्त्वाच्या कामांसाठी वेळ द्यावा लागेल आपण कौशल्याने परिस्थिती हाताळाल.

कन्या - प्रलंबित कामे पूर्ण होतील अडचणींचे प्रमाण कमी राहील तणाव दूर होतील जोडीदाराशी सुसंवाद ठेवणे आवश्यक आहे. आपल्या कार्यपद्धतीची प्रशंसा नोकरीत होईल.

तुळ - धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रमात सक्रिय योगदान द्याल. मित्रमंडळींबरोबर एखाद्या विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहाल .

वृश्चिक - चालू नोकरीत अधिकारांमध्ये वाढ होऊन जबाबदाऱ्यांमध्ये सुद्धा वाढ होईल.कार्यक्षेत्र विस्तारेल. जुने आजार नव्याने उभे राहण्याची शक्यता.

धनु - खर्चाचे प्रमाण वाढल्यामुळे योग्य तऱ्हेने पैशाचा वापर करा कुटुंबासाठी विशेष खर्च करावे लागतील. अचानक पणे काही महत्त्वाची कामे खर्चिक ठरतील.

मकर - सकारात्मक विचारां च्या व्यक्ती भेटतील. नवीन ओळखी होतील योग्य विचारांची संगत लाभेल विनाकारण खरेदीचा मोह आवरा.

कुंभ - इतरांच्या भानगडीत पडू नका. गुंतागुंतीच्या कामात लक्ष दिल्यास स्वतःला त्रास होऊ शकतो काही महत्त्वाचे निर्णय अचानक घ्यावे लागतील.

मीन - कुटुंबामध्ये तसेच मित्र मंडळाच्या वर्तुळामध्ये वाद-विवाद यांची शक्यता असल्यामुळे कोणत्याही व्यक्तीशी जास्त वाद-विवाद करू नका. कौटुंबिक शांतता पाळा.

'मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार'; २४०० रुपयांत ‘ऑपरेशन सिंदूर’ घड्याळ, HMT वर नेटकऱ्यांकडून टीकेची झोड

"यावेळी मी एकटी नाही"; विनेश फोगटने निवृत्ती मागे घेतली; सोशल मीडियावर केली भावूक पोस्ट

Mumbai Metro Update: कल्याण-तळोजा मेट्रोने गाठला महत्त्वाचा टप्पा; MMRDA ने दिली माहिती, कधी पूर्ण होणार प्रकल्प? जाणून घ्या

Mumbai : रेल्वे स्थानकावर झोपलेल्या तरुणाला तृतीयपंथींकडून मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल; सोशल मीडियावर संताप

Mumbai Viral Video : विक्रोळीतील पादचारी पुलावर शाळकरी मुलींचा जीवघेणा प्रवास, महापालिकेच्या दुर्लक्षावर संताप