आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १३ जून २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, June 13, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष : कुटुंबासाठी खर्च कराल कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण केल्यामुळे मानसिक समाधान लाभेल मनोरंजनाकडे कल असेल आपल्या समोरील कामे चिकाटीने पूर्ण कराल.

वृषभ : व्यवसाय धंद्यात भरभराट होईल नवीन कामे मिळू शकतात आर्थिक प्रगती चांगली राहील मात्र कामाचा ताण वाढणार आहे. नवीन ओळखी होतील. सरकारी व कायदेशीर कामे मार्गी लागतील.

मिथुन : आर्थिक स्थिती चांगली राहील अनेकानेक मार्गांनी धनलाभ होऊ शकतो. हितशत्रू तसेच विरोधक यांच्या कारवाया थंड पडून त्यांच्यावर विजय प्राप्त करू शकाल.

कर्क : महत्त्वाच्या कामात तसेच पूर्वी केलेल्या नियोजनात आयत्या वेळेस काही अडथळे अथवा समस्या निर्माण झाल्यामुळे मानसिक अस्वास्थ्य जाणवू शकते. मात्र इतरांना मार्गदर्शन करू शकाल.

सिंह : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी राहाल. आपल्या व्यवसाय-धंद्यात तसेच नोकरीत आपले वर्चस्व राहून आपल्या मतास प्राधान्य मिळेल आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.

कन्या : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. लोकसंग्रह वाढेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभून व्यवसायातील समस्या दूर करण्यात यश येईल. नोकरीत संबंधित व्यक्तींचे सहकार्य लाभेल.

तुळ : आरोग्य चांगले राहील. काहींना प्रवासाचे योग येतील. मात्र प्रवासात वाहनाच्या वेगावर ती नियंत्रण आवश्यक . तसेच वाहतुकीचे नियम पाळणे हितकारक ठरेल.

वृश्चिक : एखादी महत्त्वाची वार्ता कानावर आल्यामुळे मन प्रसन्न राहील. रखडलेली कामे पूर्ण करू शकाल त्यामध्ये इतरांची मदत मिळू शकते सरकारी कामे विनाविलंब पूर्ण होतील.

धनु : व्यवसाय धंदा किंवा नोकरीत घेतलेले निर्णय अंदाज अचूक ठरतील. आपल्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील. कुटुंबात आपल्या मताला प्राधान्य मिळेल.

मकर : कुटुंबात अथवा कार्यक्षेत्रात संबंधित व्यक्तींबरोबर मतभेद, वाद-विवाद घडू शकतात. असे प्रसंग जाणीवपूर्वक टाळणे आपल्याच हातात आहे हे लक्षात ठेवा. नोकरीत सहकार्य लाभेल.

कुंभ : कौटुंबिक सौख्य लाभून कुटुंबात एखादा धार्मिक कार्यक्रम होईल व्यवसाय धंद्यातील प्रगती चांगली राहील जुनी येणी वसूल होतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे हिताचे ठरेल.

मीन : व्यवसाय-धंद्यात समाधानकारक परिस्थिती राहून नफ्याचे प्रमाण वाढेल. व्यवसाय विस्ताराच्या दृष्टिकोनातून विचार करू शकाल. नवीन करार होतील. एखादा फायद्याचा सौदा हाती येईल.

नाश्त्याची चिंता मिटली! झटपट बनवा खुसखुशीत रव्याचे कटलेट

नारंगी, हिरवा की ट्रान्सपरंट? गॅस शेगडीसाठी कोणता पाईप सर्वात सुरक्षित, जाणून घ्या

घरात वारंवार दिसतात जळमटं? कोळ्यांना न मारता घरापासून दूर ठेवण्यासाठी वापरा हे घरगुती उपाय

साधेपणातही उठून दिसायचंय? उर्मिला कोठारेच्या या कॉटन साड्यांमधून घ्या स्टाइलिंग टिप्स

NEET-UG 2026 Re-Exam : विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षेसाठी १५ मिनिटे अधिक, रफवर्कसाठी जास्त जागा; NTA च्या नव्या घोषणा