मेष -व्यवसायधंद्यात नवीन गुंतवणूक करता येईल व्यवसायिक नवीन संधी मिळू शकतात. भागीदाराच्या व्यवसायात फायदा होऊ शकतो शेतीविषयक क्षेत्रातील कामे पूर्ण करू शकाल.
वृषभ - आपल्या कार्यक्षेत्रातील आपल्या कार्यामुळे इतरांवर त्याचा प्रभाव पडेल व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवण्यात यश मिळेल आर्थिक परिस्थिती मजबूत राहील.
मिथुन - नोकरी व्यवसायातील कार्य व्यक्ती वाढल्यामुळे ताण-तणाव निर्माण होण्याची. शक्यता,गोंधळून न जाता आपल्या कार्याकडे लक्ष द्या शांतपणे निर्णय घेण्याची आवश्यकता.
कर्क - आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता. आपल्या क्षमतेत बसतील एवढी कामे स्वीकारा. सरकारी नोकरीत लहान-मोठ्या प्रलोभनांपासून दूर राहणे योग्य ठरेल.
सिंह - आजचा दिवस उत्साही राहील आर्थिक बाबतीमध्ये उत्तम दिवस. दैनंदिन कामे आत्मविश्वासाने पूर्ण कराल. व्यवसाय धंद्यामध्ये नवीन संकल्पना वापरू शकाल. विद्यार्थ्यांना यश मिळेल.
कन्या - सर्वसामान्य स्वरुपाचा दिवस राहील एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडू शकते त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा थोडा संयम बाळगणे आवश्यक आहे.
तुळ - कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील नोकरीविषयक कामे होतील मित्रमंडळींमध्ये दिवस मजेत जाईल वादाच्या विषयापासून दूर राहावे. कुटुंब परिवारात समन्वय राहील.
वृश्चिक - काही वेळेस मनाविरुद्ध किरणे स्वीकारावे लागण्याची शक्यता आपली मते इतरांवर लादू नका इतरांच्या आनंदात आनंद माला नोकरी-व्यवसायात दिवस ठीकठाक राहील.
धनु - शैक्षणिक बाबतीत आजचा दिवस यशदायी ठरेल विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळून उच्च शिक्षणाचे मार्ग प्रशस्त होतील रखडलेली कामे पूर्ण होतील.
मकर- मनाला आनंद व उत्साह देणाऱ्या घटना घडल्यामुळे आत्मविश्वासात वृद्धी होईल कामाची कार्य व्याप्ती वाढल्यामुळे धावपळ होईल कुटुंबात विवाह सारखे कार्य ठरू शकते.
कुंभ - स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देणे गरजेचे राहील कामाचा ताण वाढेल व्यवसाय-धंद्यात आर्थिक उलाढाली चांगल्या होतील. आर्थिक मदत मिळू शकते. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल.
मीन - इतर कोणाचाही वादात न पडता आपण आपल्या कार्यात कार्यमग्न राहणे हितकारक ठरेल वाद-विवाद यांपासून दूर राहा. राहत्या घराबाबत चे प्रश्न संपुष्टात येतील वाहने जपून चालवा.