आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १४ जून २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, June 14, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आरोग्य चांगले राहील यामुळे आपल्यासमोर अनेक कामे आपण उत्साहाने आणि गतिशील त्यांनी पूर्ण कराल मात्र आपल्या कामाकडे पूर्णपणे लक्ष ठेवणे गरजेचे ठरेल.

वृषभ - वैवाहिक सौख्य व समाधान लाभेल आरोग्य उत्तम राहील. आपल्या समोरील कामे आपण जिद्द ठेवून चिकाटीने पूर्ण कराल एखादे महत्त्वाचे काम हातावेगळी करता येईल.

मिथुन - आर्थिक लाभाच्या दृष्टीने उत्तम दिवस आहे. अनेक अनेक मार्गांनी धनलाभ होऊ शकतो आपल्या राहत्या घरासाठी खर्च करू शकाल तसेच घरातील व्यक्तींसाठी खरेदी करू शकाल.

कर्क - व्यवसाय धंद्यातील जुनी येणे वसूल होतील तसेच दीर्घ काळ रखडलेली सरकारी कामे पूर्ण करण्यात यश मिळेल. कामगारांचे सहकार्य मिळेल.

सिंह - गुरुजन तसेच ज्येष्ठांचा आशीर्वाद लाभेल. सकारात्मक विचारांच्या व्यक्तींच्या सहवासात याल. अध्यात्मिक तसेच धार्मिक बाबींमध्ये रस निर्माण होईल.

कन्या - व्यवसायामध्ये चांगली परिस्थिती राहील जिद्द व चिकाटी वाढून आपली कामे पूर्ण कराल. कुटुंबामध्ये सर्वांचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे मिळत राहील. समाधानी राहाल.

तुळ - सामाजिक तसेच धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. राजकीय क्षेत्रातील कार्यरत जातकांना केलेल्या कामाचे फळ मिळेल. एखादी नवीन जबाबदारी आपण होऊन घ्याल.

वृश्चिक - कौटुंबिक सुख मिळवून संतती सौख्य लाभेल. कुटुंबात सुखद वार्ता कानी येतील एखाद्या छोटेखानी समारंभाचे नियोजन करू शकाल. महत्त्वाचे काम झाल्यामुळे उत्साह द्विगुणित होईल.

धनु - कुटुंबात तसेच आपल्या कार्यक्षेत्रात आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या हट्टीपणा ला आवर घाला. कुटुंबातील इतर व्यक्तींच्या मताला प्राधान्य द्या.

मकर - महत्त्वाच्या कामांमध्ये अचानक काही समस्या निर्माण होऊ शकतात परंतु आपल्या प्रयत्नांनी त्याचे निवारण पण होईल प्रयत्न थांबवू नका. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहील.

कुंभ - जमीन जुमला तसेच स्थावर मिळकती बाबतचे रखडलेले व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे मध्यस्थांची मदत मिळेल समस्येचे निवारण होईल. कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील.

मीन- नोकरी तसेच व्यवसाय धंद्याच्या ठिकाणी संबंधितांचे अपेक्षित सहकार्य मिळेल महत्त्वाच्या कामामध्ये आपले मत विचारात घेतले जाईल. एखादी नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल.

नारळ फोडण्यासाठी जोर लावू नका; ही सोपी ट्रिक ठरेल फायदेशीर, जाणून घ्या प्रत्येक भागाचे उपयोग

Sunday Special Recipe : कुरकुरीत आणि स्वादिष्ट मटण स्प्रिंग रोल; पाहा स्टेप बाय स्टेप रेसिपी

डीप बॅकलेस नको? मग हे ८ ब्लाऊज डिझाइन्स देतील तुम्हाला एलिगंट आणि ट्रेंडी लुक

पावसाळ्यात 'हे' पदार्थ खाणं टाळा! नाहीतर आरोग्य बिघडण्याची शक्यता

Bhiwandi : 'कृपया गुटखा मागू नका'; तुकाराम मुंढेंच्या कारवाईनंतर पानटपऱ्यांवर झळकले फलक