आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १४ मे २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, May 14, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - विद्यार्थ्यांना चांगला दिवस विविध प्रकारच्या परीक्षांमध्ये यश मिळेल योग्य मार्गदर्शन मिळेल प्रवास होतील एखादी चांगली बातमी कळेल त्यामुळे उत्साह वाढेल. आत्मविश्वास निर्माण होईल.

वृषभ - आर्थिक आवक चांगली राहील प्रगतीला पोषक असा दिवस आहे विविध प्रकारचे लाभ होतील नातेवाईक आप्तेष्ट यांच्या भेटीगाठी होतील चांगल्या बातम्या कानावर पडतील.

मिथुन - अचानक धनलाभ होण्याची शक्यता एखादे महत्त्वाचे काम पूर्णत्वास जाईल महत्त्वाच्या कामात ओळखी मध्यस्ती उपयोगी येतील नोकरीत बदलीची शक्यता.

कर्क - कुटुंबात अथवा परिवारात व आपल्या कार्यस्थळी वाद - विवाद टाळणे महत्त्वाचे ठरेल कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करू नका सहकाऱ्यांचे सहकार्य मिळवावे लागेल.

सिंह - नियोजित कामे मार्गी लागतील इतरांची मदत मिळू शकते वाद-विवाद टाळणे श्रेयस्कर ठरेल नोकरीत राजकारण आणि गटबाजी पासून दूर राहा.

कन्या - जोडीदाराशी मधुर संबंध राहतील स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरेल काहींना जवळचे प्रवास करावे लागतील नोकरीत तडकाफडकी निर्णय घेणे चुकीचे ठरेल थोडा संयम ठेवा.

तुळ - व्यवसाय-धंद्यात समाधानकारक परिस्थिती राहील आर्थिक आवक उत्तम राहील मालमत्तेच्या व्यवहारात फायदे होतील समाजसेवा करण्यात रस घ्याल छोटेखानी समारंभात सहभागी व्हाल.

वृश्चिक - रोजच्या कामात बदल घडतील आर्थिक स्थिती मजबूत राहील विविध मार्गांनी धनलाभ होऊ शकतो घरात काही वाद होतील | गैरसमजाचे वातावरण राहील हितशत्रू डोके वर काढू शकतात.

धनु - भाग्याची अनुकूलता लाभेल कौटुंबिक सुख मिळेल नोकरीत बदलीची किंवा कामात बदल होण्याची शक्यता आहे मुलांकडून चांगल्या बातम्या कानावर येतील.

मकर - नोकरी व्यवसाय धंदा यांच्या निमित्ताने प्रवास होतील भावंडांच्या भेटीगाठी होतील वाहन सुख मिळेल घरात मतभेदांची शक्यता गैरसमज होण्याची शक्यता आहे.

कुंभ - दैनंदिन कामावर तीर्थ इतरही कामे करणे गरजेचे ठरेल स्वतःची कामे स्वतः करा संयम सोडू नका रागाला आवर घाला खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

मीन - कोणतेही लहान-मोठे निर्णय घेताना ते शांतपणे घेणे आवश्यक घाईगर्दीत निर्णय घेऊ नका नुकसानकारक ठरू शकते तसेच आर्थिक व्यवहारात सतर्क राहणे.

स्वतः त्याग केला तरच त्याला अर्थ आहे

काळ्या मनुक्याचे आरोग्यदायी फायदे; पचन, त्वचा आणि हाडांसाठी लाभदायक

प्राचीन नाणेघाट व्यापारी मार्गाचा आता ‘डिजिटल वारसा प्रवास’; १८ मे रोजी ऑडिओ गाइड टूरचे लोकार्पण

एअर इंडियाचा मोठा निर्णय; इंधनाच्या वाढत्या दरांमुळे अनेक फ्लाईट्स रद्द, 'या' मार्गांवर होणार परिणाम

Mumbai : कोस्टल रोडवर हरित क्षेत्रासाठी सिंगापूर-बँकॉकची थीम; उद्यान, स्पोर्ट्स कोर्ट्स, आऊटडोअर जिम इत्यादी सुविधा, रिलायन्स साकारणार हरित क्षेत्र