आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १५ जुलै २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, July 15, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष: स्वतःचा वैयक्तिक सुसंवाद यांने नाते संबंधमधील सुधारणा होतील. तुम्हाला व तुमच्या जोडीदाराला एखादी आनंदी आणि उत्साहवर्धक बातमी समजेल. आनंद स्वतःमध्येच दडलेला आहे.

वृषभ : नोकरीमध्ये जिद्दीने कार्यरत रहाल. आपली स्थिती समाधान कारक राहणार आहे.नोकरीमध्ये काम आपणास जास्त असणार आहे.आपणास सहकार्य मिळाल्याने त्याचा ताण वाटणार नाही.

मिथुन : नोकरी व्यवसायामध्ये नवीन संदेश मिळतील. आपण त्याप्रमाणे कामाची दिशा बदलाल, त्याचे फायदे आपणास होणार आहेत. नवीन काम मिळण्याची शक्यता आहे.

कर्क : आज आपल्या मध्ये भरपूर आत्मविश्वास असणार आहे.आपल्याला स्वतःसाठी काम करायचे आहे याची जाणीव होणार आहे. त्यामुळे व्यक्तिगत कामांकडे लक्ष द्याल.

सिंह : रास-आज अनेकांशी सुसंवाद होतील.प्रियजनांच्या ख्यालीखुशाली चे फोन होतील .त्यामुळे आपण आनंदी राहणार आहात. जुन्या आठवणी गुंतून जाल.छोटासा प्रवास होऊ शकतो.

कन्या : गृह सौख्यात वाढ होणार आहे. नोकरी व्यवसायातील बदल आपणासाठी अनुकूल असणार आहेत. बदलाला आनंदाने सामोरे जा. आर्थिक व्यवहार चांगले होतल.

तुळ : आपल्या कार्यक्षेत्रातील अडचणी दूर झाल्यामुळे आपणास मनःशांती लाभणार आहे. जास्तीच्या जबाबदारीचेही नियोजन होणार आहे .आपल्या मनावरचे ओझे कमी झाल्यामुळे आनंदी राहाल .

वृश्चिक : घरातील जुने वाद संपुष्टात येतील. आपणास उत्तम लोकांची संगत लाभणारा आहे. घरातील छोट्या कार्यक्रमात मन रमवाल. घरातील व्यक्तींचे सहकार्य मिळणार आहे.

धनु : अडथळ्यांची शर्यत संपणार आहे. केलेल्या कामाचे श्रेय मिळणार आहे. कामात महत्त्वाची जबाबदारी पूर्ण केल्यामुळे आपणास समाधान मिळणार आहे. आर्थिक नियोजन चांगले असेल.

मकर :नोकरीमध्ये कामातील अडचणी आधीच समजून घ्या. त्याप्रमाणे काम करा, महत्त्वाची कामे पूर्ण करण्याकडे लक्ष असू द्या. सरकारी कामे होतील. व्यापार कामातील प्रगती समाधान देईल.

कुंभ : नोकरीत प्रगती होणार आहे आहे. काही धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल. प्रवासाची शक्यता आहे. व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित असे ठोस उपाय करण्याची योजना असेल.

मीन : लहान सहान कारणाने आपले मन कलुषित करून घेऊ नका. सुसंवाद करण्याचा प्रयत्न करा.सकारात्मक विचाराने कामाला चालना मिळणार आहे. जोडीदाराकडून आपणास सहकार्य मिळणार आहे.

भारतीय खलाशाचा मृत्यू; होर्मुझमध्ये इराणी हल्ल्यात बळी, भारताने केला निषेध

रामचंद्र कह गये सिया से ऐसा कलयुग आयेगा

तुम्हीही कांदे-बटाटे एकत्र ठेवताय? आधी 'हे' वाचा

Breakfast Recipe : हेल्दी, टेस्टी आणि झटपट; सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा शेवई उपमा

'कोर्टाची दिशाभूल केली, आता परिणाम भोगा'; समय रैनाला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, 'इंडियाज गॉट लेटेंट' प्रकरणी ३ लाखांचा दंड