मेष : मित्रमंडळींच्या वर्तुळात तसेच आप्तेष्ट नातेवाईक यांच्यामध्ये कोणालातरी आपल्या मदतीची आवश्यकता भासेल. वैवाहिक सौख्य लाभून कुटुंबातील वातावरण चांगले राहील.
वृषभ : आपला मनोरंजनाकडे कल असेल. खर्चामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. धार्मिक तसेच सामाजिक कार्यात भाग घ्याल. एखाद्या समारंभात मानाचे स्थान मिळेल.
मिथुन : समाजातील मान्यवरांच्या नवीन ओळखी होतील. या ओळखीचा उपयोग आपली महत्त्वाची कामे करण्यासाठी होईल. पारिवारिक सुख लाभून मुलांची प्रगती होईल. अर्थप्राप्ती होईल.
कर्क : विद्यार्थ्यांची अभ्यासू वृत्ती जागृत होईल अभ्यासामध्ये मन लागेल अनपेक्षित निकाल हाती येतील. घरामध्ये पाहुणे मंडळी येतील. लोकसंपर्क वाढून सामाजिक कार्यात रस घ्याल.
सिंह : व्यवसाय धंद्यात उत्पन्नाचे प्रमाण वाढेल. मनात असेल तसा खर्च करू शकाल. कुटुंब परिवारातील वातावरण आनंदी आणि | उत्साही राहील. स्वतःसाठी तसेच इतरांसाठीही खरेदी कराल.
कन्या : चांगल्या, शुभवार्ता मिळाल्यामुळे आनंदी आणि उत्साही रहाल. आपल्या समोरील कामे वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न | कराल. प्रयत्नांमध्ये यश लाभेल.
तूळ : व्यवसायात अनुकूलता लाभेल. व्यवसाय विस्ताराचे नियोजन करू शकाल. निरनिराळ्या संधी मिळतील. मन धार्मिक इकडे ओढ घेईल. कायदेशीर प्रश्न सुटतील.
वृश्चिक : संत सज्जनांचे दर्शन होईल त्याचबरोबर त्यांचे मार्गदर्शन लाभेल. काही दैवी प्रचिती येण्याची शक्यता आहे. घरात मंगल कार्य ठरतील. परदेश गमनाबद्दल नियोजन यशस्वी होईल.
धनु : नवीन योजना आखाल उत्साहाने उमेदीने आपल्या पुढील कार्य करण्यात मग्न राहावे. समाजातील थोरामोठ्यांचे सहकार्य लागेल. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहील.
मकर : काही महत्वपूर्ण घटनांमध्ये शुभ परिणाम मिळाल्यामुळे आपली परमेश्वरावर ची श्रद्धा दृढ होईल. घरात धार्मिक अनुष्ठान घडेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.
कुंभ : व्यवसाय धंद्यात समृद्धी कारक घटना घडतील. घरातील स्त्रियांचा भाग्योदय. कुटुंबातील वातावरण आनंदी राहून मंगल कार्य घडतील. काहींना परदेशगमनाच्या संधी मिळू शकतात.
मीन : क्रोधाला आवर घालणे आवश्यक आहे. भाग्याची उत्तम साथ आपल्याला मिळेल. काहींना प्रवास गळेल. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास करावा लागेल.