राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १६ ऑगस्ट २०२५: जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, August 16, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आपल्याला सकारात्मक विचारांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. आजचा दिवस प्रयत्नांती परमेश्वर आहे. त्यामुळे प्रयत्नांमध्ये कसूर करू नका. चुकीच्या गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. सावध राहणे आवश्यक.

वृषभ - आजच्या दिवसात आपल्याला नशिबाची साथ मिळणार आहे. नोकरीत फायदे होणार आहे. नोकरीतील बदल आपल्याला फायद्याचे ठरणार आहेत. मात्र नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागणार आहे.

मिथुन - स्वतंत्र व्यावसायिकांना आजचा दिवस चांगला राहणार आहे. नोकरीमध्ये चांगला कालावधी असेल. सहज सुरळीत कामे होणार आहेत. हाताखालील वर्गाचे सहकार्य चांगल्या प्रमाणात मिळणार आहे.

कर्क - आपल्या मन प्रसन्न करणारा दिवस जाणार आहे कार्य क्षेत्रात प्रगती होईल संततीचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत कराल. त्यांच्या यशाने घरातील वातावरण सुखमय होणार आहे.नवीन कामे मिळतील.

सिंह - जमीन-जुमला ची कामे मनासारखी होणार आहेत भावंडांच्या गाठी भेटी होऊ शकतात ग्रह ते चांगले मिळणार आहे नोकरीमध्ये प्रगती होणार आहे आवक चांगली असणार आहे दानधर्म कराल.

कन्या - आज आपण कामकाजात मग्न राहणार आहे. नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. बौद्धिक विचाराने आणि सहकार्याने काम करून यश मिळवा. चुकीचे बोलण्याने नुकसान होण्याची शक्यता आहे.

तुळ - कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य दिलास खरा आनंद उपभोगता येणार आहे. व्यापार-व्यवसायात प्रगती होईल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कोणतीही समस्या हुशारीने व समजूतदारपणे सोडवा. आर्थिक फायदे होणार आहेत.

वृश्चिक - आपल्यासमोर एका वेळेला अनेक कामे दिसणार आहे. तरीसुद्धा एका वेळेस एकच काम करावे. कुठल्याही प्रकारची घाई गडबड करू नका. आपणास व्यापार व्यवसायासाठी अनेक संधी येतील. मनोबल वाढवा.

धनु - मनावर अनामिक दडपण राहणार आहे. काही महत्त्वाची कामे लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे आपल्या मनावर थोडे ओझे वाटणार आहे. मनःशांतीसाठी उपायोजना करा. नोकरीमध्ये अस्थिरता जाणवणार आहे.

मकर - आजचा दिवस सर्व बाबतीत चांगला आहे. आपणास खरे समाधान मिळणार आहे. संगणक तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिशय उत्तम दिवस आहे. प्रियजनांच्या गाठीभेटी मुळे मन आनंदित राहणार आहे.

कुंभ - नोकरदारांनी वरिष्ठांचे मिळतेजुळते घ्यावे कामांचे अर्ज करण्यासाठी हा काळ अतिशय चांगला आहे कामाचा उत्साह वाढणार आहे कला सजावट सजावटीचे सामान या क्षेत्रातील व्यक्तींना चांगली प्रगती होईल.

मीन - आज सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा चांगला दिवस राहणार आहे. लोकांच्या मागे उभे राहून त्यांना मदत कराल. आपली चिडचिड पण कमी होणार आहे. सर्वसाधारणपणे आज भाग्य वृद्धीचा दिवस असणार आहे.

मुंबईकरांचे झोपेचे गणित बिघडले, मिळत नाही आठ तासांचीही झोप; शहरी जीवनशैलीचा दुष्परिणाम

CBSE चा मोठा निर्णय; मध्यपूर्वेत ७ देशांतील बारावीच्या परीक्षा रद्द, निकालाबाबत लवकरच होणार घोषणा

Air Indiaच्या ट्रॅव्हल पॉलिसीचा गैरवापर; ४ हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना दंड

दहावी-बारावी परीक्षेत 'मास कॉपी'चे प्राबल्य; १०३ कर्मचाऱ्यांवर गुन्हे; निलंबनाची कारवाई

ठाणे जिल्ह्यात HPV लसीकरण मोहिमेला वेग; १४-१५ वर्षांच्या मुलींना मोफत लस; पालकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन