मेष - मनोरंजन व करमणूक इकडे कल राहील त्यासाठी खर्च सुद्धा कराल मित्रमंडळींच्या समवेत मजेत वेळ जाईल आर्थिक आवक मनासारखी राहिल.
वृषभ - प्रेमात अनुकूलता मिळेल.महत्त्वाची कामे थोड्या प्रयत्नांनी पूर्ण होताना बघून आश्चर्य वाटेल अडथळ्यांची शर्यत जिंकाल नोकरीत अनुकूल घटना.
मिथुन - नोकरीतील परिस्थिती चांगली राहील वरिष्ठांची संबंध चांगले राहतील व्यवसाय धंद्यात समाधान कार परिस्थिती राहील जुनी येणी येतील.
कर्क - महत्त्वाच्या कामात अडथळे येण्याची शक्यता आहे महत्त्वाच्या विषयांवर इतरांशी चर्चा करून निर्णय घ्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आर्थिक लाभ होतील.
सिंह - कौटुंबिक सुख लागून मुलांकडून चांगल्या वार्ता कानावर येतील .महत्त्वाचे निर्णय घेता येतील,कामाचा ताण जाणवेल. अपेक्षा पूर्ण होतील.
कन्या - सरकारी स्वरूपाच्या कामात विलंब लागू शकतो इतरांच्या ओळखीचा उपयोग होईल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील सार्वजनिक क्षेत्रात कल वाढेल.
तुळ - विद्यार्थ्यांनी वेळेचा अपव्यय करणे टाळावे वेळेचे नियोजन महत्त्वाचे ठरेल. कुसंगती टाळावी त्याचबरोबर वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
वृश्चिक - आर्थिक आवक चांगली झाल्यामुळे मौजमजेसाठी पैसा खर्च कराल. भावंडांना मदत करण्याची इच्छा होईल मात्र तब्येतीची काळजी घ्या दुर्लक्ष करू नका.
धनु - कुटुंबातील मुलांच्या प्रगतीपर वार्ता कळतील त्यांची प्रशंसा झालेली बघून आनंद वाटेल मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी संवाद साधा.
मकर - जोडीदारास सांभाळून घ्यावे लागेल जोडीदाराचा लहरीपणा बघून आश्चर्य वाटण्याची शक्यता भावंडांशी वाद-विवाद टाळा घरातील सदस्यांशी समन्वय राखा.
कुंभ - भागीदारी व्यवसायात जपून व्यवहार करा.स्वतःचे निर्णय शांतपणे घ्या मतभेदांची शक्यता मात्र अडचणी कमी होतील नोकरी चांगली परिस्थिती राहू शकते.
मीन - अचानक धनलाभ याची शक्यता.वडिलोपार्जित संपत्ती विषयी असलेले वाद-विवाद संपतील. जीवनसाथीची चांगली साथ मिळेल नोकरीत चांगली परिस्थिती राहील.