मेष - आपल्याला सकारात्मक विचारांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. आजचा दिवस प्रयत्नांती परमेश्वर आहे. त्यामुळे प्रयत्नांमध्ये कसूर करू नका. आर्थिक लाभ होतील. सावध राहणे आवश्यक.
वृषभ - आजच्या दिवसात आपल्याला नशिबाची साथ मिळणार आहे. नोकरीतील बदल आपल्याला फायद्याचे ठरणार आहेत. मात्र नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागणार आहे.
मिथुन - स्वतंत्र व्यावसायिकांना आजचा दिवस चांगला राहणार आहे. सहज सुरळीत कामे होणार आहेत. हाताखालील वर्गाचे सहकार्य चांगल्या प्रमाणात मिळणार आहे.
कर्क - आपल्या मन प्रसन्न करणारा दिवस जाणार आहे कार्य क्षेत्रात प्रगती होईल संततीचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत कराल. त्यांच्या यशाने घरातील वातावरण सुखमय होणार आहे.
सिंह - जमीन-जुमला ची कामे मनासारखी होणार आहेत भावंडांच्या गाठी भेटी होऊ शकतात ग्रह ते चांगले मिळणार आहे नोकरीमध्ये प्रगती होणार आहे आवक चांगली असणार आहे.
कन्या - आज आपण कामकाजात मग्न राहणार आहे. नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. बौद्धिक विचाराने आणि सहकार्याने काम करून यश मिळवा.
तुळ - कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य दिलास खरा आनंद उपभोगता येणार आहे. व्यापार-व्यवसायात प्रगती होईल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कोणतीही समस्या हुशारीने व समजूतदारपणे सोडवा.
वृश्चिक - आपल्यासमोर एका वेळेला अनेक कामे दिसणार आहे. तरीसुद्धा एका वेळेस एकच काम करावे. कुठल्याही प्रकारची घाई गडबड करू नका. मनोबल वाढवा.
धनु - मनावर अनामिक दडपण राहणार आहे. काही महत्त्वाची कामे लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे आपल्या मनावर थोडे ओझे वाटणार आहे. मनःशांतीसाठी उपायोजना करा.
मकर - आजचा दिवस सर्व बाबतीत चांगला आहे. आपणास खरे समाधान मिळणार आहे. नोकरदारांना दिलासा मिळेल. संगणक तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिशय उत्तम दिवस आहे.
कुंभ - नोकरदारांनी वरिष्ठांचे मिळतेजुळते घ्यावे कामांचे अर्ज करण्यासाठी हा काळ अतिशय चांगला आहे. कला सजावट सजावटीचे सामान या क्षेत्रातील व्यक्तींना चांगली प्रगती होईल.
मीन - आज आपल्या सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा चांगला दिवस राहणार आहे. लोकांच्या मागे उभे राहून त्यांना मदत कराल. आपली चिडचिड पण कमी होणार आहे.