आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य,१६ जून २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, June 16, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आज आपल्या शब्दास उचित प्राधान्य मिळेल. मुला मुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल तुमचे निर्णय योग्य ठरतील. एखादे महत्त्वाचे काम होईल. प्रवासाची शक्यता.

वृषभ - सामाजिक कार्यात सक्रिय योगदान द्याल मानसन्मान प्रतिष्ठा लाभेल आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. जुने मित्र भेटल्यामुळे आनंदी राहाल कौटुंबिक सौख्य लाभेल.

मिथुन - समाजातील मान्यवर व्यक्तींच्या ओळखी वाढतील त्याचप्रमाणे त्यांचे मार्गदर्शन लाभून मदत मिळू शकते. गुरुजनांचे आशीर्वाद लाभतील. धार्मिक तेकडे कल राहील.

कर्क - आपल्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील चांगले अनुसंधान साधून महत्त्वाची कामे करता येतील कर्तृत्वाला योग्य सन्मान मिळेल. आरोग्याकडे लक्ष ठेवणे हितकारक राहील.

सिंह - जिद्दीने एखादे महत्त्वाचे काम हातावेगळे करण्यात यश मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेता येतील.आत्मविश्वासात वाढ होईल. कामात गती येईल.

कन्या - आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळे चिंता कमी होतील मात्र कार्यमग्न राहण्याची आवश्यकता कामाचा कंटाळा करू नका.

तुळ - दिवसातला बराचसा वेळ मित्रमंडळींच्या समवेत मौजमजेत व मनोरंजना मध्ये व्यतीत होईल नवीन ओळखी होतील आर्थिक चिंता मिटेल.

वृश्चिक - हाती घेतलेल्या कामात यश मिळेल आपले आवडते छंद जोपासता येतील. एखादी सुवर्णसंधी हाती येऊ शकते.

धनु - जुनी येणी येतील कामात यशस्वी व्हाल घरातील व्यक्तींची काळजी घ्या त्याचबरोबर स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका आजारांवर वेळीच उपाययोजना करा.

मकर - आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या कुटुंबातील ज्येष्ठांच्या प्रकृतीकडे पुरेसे लक्ष ठेवणे आवश्यक आहे महत्त्वाची कामे यशस्वी होतील.

कुंभ - सार्वजनिक कार्यात तसेच धार्मिक कार्यात दानधर्म कराल. जवळच्या एखाद्या धार्मिक पवित्र स्थळी सहकुटुंब सहपरिवार भेट देण्याचा योग संभवतो.

मीन - मोठे मनसुबे आखाल. गूढगोष्टींचे आकर्षण राहील धार्मिकते कडे कल राहू शकतो आर्थिक परिस्थिती उंचावेल दानधर्म करणे कर्तव्य समजाल.

ममतादीदींच्या शरणागतीचे आश्चर्य

ब्रेकफास्टसाठी बेस्ट! पालक, चीज आणि व्हीट ब्रेडपासून बनवा हेल्दी सँडविच, वाचा रेसिपी

तणावावर रामबाण उपाय; 'ही' योगासनं ठरतील फायदेशीर

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंना जयपूर आंदोलनात मारहाण; Video व्हायरल, घटनेनंतर दिपके यांची पोस्ट चर्चेत

२२ व्या वर्षी जगाचा निरोप; अभिनेत्री संचिता उगलेने राहत्या घरीच संपवलं जीवन, पोलीस तपास सुरू