आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १६ मार्च २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, March 16, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष -आपली बाजू शांतचित्ताने मांडल्याने आपल्याविषयी झालेले गैरसमज दूर करता येतील. आपल्या क्षेत्रामध्ये आपण काढलेले अंदाज आणि ठोकताळे बरोबर येणार आहेत.

वृषभ - आपली आवक आणि खर्च याच्यामध्ये खूप तफावत असणार आहे खर्च करताना जपून करा. प्रभास होण्याची शक्यता आहे आपल्या तब्येतीची काळजी घेणे.

मिथुन - नवीन दिवस नवीन मार्ग याचा चांगला अनुभव आपणास आज येणार आहे. वरिष्ठांशी अपेक्षित साथ मिळणार आहे. कामे सुरळीत पार पडतील. विरोधकांच्या कारवायात वाढ होणार आहे.

कर्क - आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभणार आहे. तुम्ही मनोमन सुखावून जाणार आहात. आर्थिक आवक चांगली असणार आहे. विवाह इच्छुकांचे शुभ कार्य होईल.

सिंह - आपल्या कार्यक्षेत्रात प्रगतीच्या संधी येणार आहे.याबाबतीत मित्रांशी संवाद साधाल.मित्रांची जरी चर्चा केली तरी स्वतःच्या मनाने कार्य करणार आहात.

कन्या - आवक वाढल्याने खर्चही वाढणार आहे. नोकरी व्यवसायात वरिष्ठांनी सोपविलेली कामे जबाबदारीने अधिक परिश्रमाने पूर्ण करावी लागतील. वेळ वाया घालू नका.

तुळ - मनातील किल्मिष दूर होणार आहे. कामातील सातत्य व एकाग्रता हेच आपल्या यशाचे गमक ठरणार आहे. तुम्ही दिलेला शब्द पाळण्यासाठी काही अडचणी येऊ शकतात.

वृश्चिक -आपल्या कामामध्ये आपल्याला अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे मार्गी लावताना सहकाऱ्यांचा सल्ला घ्या. जिद्दीने सर्व गोष्टींवर मात करा.

धनु -आजचा दिवस आपल्या प्रगतीचा आहे. कोणाची मतभेद होतील असे वागू नका. कोणाला किती जवळ करायचे व किती लांब ठेवायचे हे स्वतःच्या विचारावर अवलंबून आहे.

मकर -आपल्या कष्टाचे फळ आपणास मिळणार आहे. आर्थिक व्यवहार करताना वरिष्ठांची चर्चा करा. कार्यक्षेत्रातील सहकार्‍यांना विश्वासात घेऊन महत्त्वाचे निर्णय घ्या.

कुंभ -उत्साहवर्धक व आनंददायी असा दिवस आहे आर्थिक व्यवहारात लाभाचे संकेत मिळतील तुमचे मौजेची इच्छा पूर्ण होईल योग्य संधी आपण तत्परतेने पूर्ण कराल.

मीन - योग्य दिशेने व योग्य मार्गाने वाटचाल करून आपले ध्येय साध्य करावे लागेल. विरोधकांना रोखण्यासाठी नवीन डावपेच आखावे लागतील. आपल्या कामांमध्ये दिरंगाई करू नका .

Mumbai : प्रवाशांची होणार गैरसोय; उद्या पश्चिम व मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक

Iran vs US-Israel War: तेल पुरवठ्यात अस्थिरता; इराणने अमेरिकेचा दावा फेटाळला

Mumbai : उद्धव ठाकरे यांच्याकडून एक्सपोर्ट-इम्पोर्ट लॉजिस्टिक्स कोर्सचा शुभारंभ; काय आहे खास? फी किती? जाणून घ्या

Mumbai : धक्कादायक! वृद्धाश्रमात ज्येष्ठ महिलेला झाडूने मारहाण; Video व्हायरल होताच संतापाची लाट

Mumbai : '...तर गॅस कनेक्शन बंद होईल!' Mahanagar Gasच्या नावाने सायबर स्कॅम; अंधेरीत महिलेला ₹५,०००चा गंडा