मेष - समाजातील मान्यवरांच्या भेटी गाठी होऊन आपली रखडलेली कामे पूर्ण होण्यासाठी त्या भेटीचा लाभ होईल. अडचणींवर मात कराल यश मिळेल जीवन साथी प्रेमाने वागेल.
वृषभ - कोणतेही निर्णय तडकाफडकी घेऊ नका. महत्वाच्या कामासाठी प्रवास घडू शकतो अडचणींवर मात करण्यासाठी ईश्वर कृपा प्राप्त होईल. नोकरीत चांगली परिस्थिती राहील.
मिथुन - नोकरी-व्यवसायात एखादी नवीन संधी चालून येईल. नवीन भागीदारी बद्दल विचारणा होऊ शकते. नोकरीत एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी आपली निवड होऊ शकते.
कर्क - बहीण-भावंडांची सहकार्य लाभेल व्यवसायात भरभराट होऊ शकते काही धाडसी निर्णय घ्यावे लागतील आपले ज्ञान व अनुभव याचा फायदा होईल.
सिंह - आर्थिक आवक समाधानकारक राहील नवीन गुंतवणुकीचा विचार असेल प्रवास लाभदायक ठरतील जवळच्या लोकांच्या सहवासात मनावरचा ताण हलका होईल.
कन्या - सामाजिक अथवा धार्मिक कार्यात रस निर्माण होईल. तसेच धार्मिक कार्यात रस घ्याल. देवदर्शनासाठी प्रवासाची शक्यता ईश्वर कृपा लाभेल.
तुळ - कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयी काही महत्त्वाच्या घटना घडू शकतात त्यामध्ये गुरुजनांचे सहकार्य लाभेल. कुटुंबात मंगल कार्याची शक्यता.
वृश्चिक - नोकरीत आत्तापर्यंत घेतलेल्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटेल. नोकरीत आपल्या कार्याची प्रशंसा होऊन कौतुक होईल पदोन्नती ची शक्यता.
धनु - धार्मिक कार्यात सक्रिय योगदान द्याल समाजसेवा करण्यासाठी पुढाकार घ्याल. खर्च करावा लागेल महत्त्वाचा प्रकल्पात सहभागी होण्याची संधी मिळेल.
मकर - नियोजित कार्यक्रमात अडचणींमुळे बदल करावा लागण्याची शक्यता शत्रू बलवान होऊ शकतात जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात सावधानता बाळगणे गरजेचे राहील.
कुंभ - मित्रमंडळींच्या वर्तुळात अथवा कुटुंबात किरकोळ कारणांवरून वाद वाढवू नका ना त्यांना महत्त्व द्या तसेच भावंडांशी गैरसमजातून वाद निर्माण होतील ते टाळा.
मीन - अडचणी दूर होतील. महत्वाची कामे होतील नोकरी चांगली परिस्थिती राहून आपल्या कामाचे कौतुक होईल वरिष्ठांशी संबंध सुधारतील.