आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १७ मार्च २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, March 17, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष -आपली कामातील जबाबदारी वाढणार आहे. आर्थिक व्यवहार जपून करा. पैसे उसने देताना विचार करून द्या. कायद्याची बंधने पाळावी. आरोग्याची काळजी घेणे, खाण्यापिण्याकडे लक्ष द्या.

वृषभ - व्यापार-व्यवसायात जोखीम पत्करू नका. आज खरेदी होईल. हातून दानधर्म पण होणार आहे. नोकरीत प्रगती होणार आहे. पगारवाढ मिळण्याची शक्यता. तब्येतीकडे लक्ष द्या.

मिथुन - मन शांत ठेवणे आवश्यक आहे.आर्थिक आवक चांगली राहणार आहे. समाज सेवा करण्यासाठी वेळ द्याल. स्वतःच्या तब्येतीची काळजी घेऊन मग समाजसेवा करा.

कर्क - व्यवसायामध्ये चांगला जम बसणार आहे. कुटुंबातील वातावरण समाधान कारक असणार आहे. घरातून आपल्याला चांगल्या प्रकारे सहकार्य मिळणार आहे.

सिंह -आपल्या बहीण-भावांचे संबंध मधुर राहणार आहे. त्यांचे काही प्रश्न सोडवण्यासाठी आजचा दिवस आपणास द्यावा लागणार आहे.आपल्याविषयी त्यांच्या मनात आदर वाढणार आहे.

कन्या -आपणास विविध मार्गाने पैसे मिळण्याची शक्यता आहे पण खर्चही त्या प्रमाणात वाढते जमाखर्चाचे अंदाजपत्रक विस्कळीत होऊन देऊ नका का ग्रह व त्यात वाढ होणार आहे.

तुळ - खाजगी क्षेत्रातील नोकरी करणार्‍या व्यक्तींना शुभवार्ता समजेल. नवीन नवीन योजना कार्यान्वित करण्याचा विचार असेल. पण सर्व प्रकारची दक्षता घेणे चांगले.

वृश्चिक - कोणतेही काम करताना घाईगडबडीने करू नका. नियम अटी पाळल्या जात आहेत की नाही याची खातरजमा करण्याची गरज आहे.

धनु - आवक चांगली राहणार आहे. नोकरीमध्ये विचारपूर्वक काम करणे आवश्यक आहे. कामामध्ये काही प्रश्न निर्माण झाल्यास सहकाऱ्यांचा सल्ला घेणे, आपल्यासाठी फायदेशीर आहे.

मकर - नवीन योजना अमलात आणण्याचा विचार करणार आहात, तत्पूर्वी वरिष्ठांचा विचार करणे आवश्यक आहे. रखडलेली कामे हातावेगळी करण्याचा प्रयत्न यशस्वी होणार आहे.

कुंभ - नोकरीमध्ये प्रगती होणार आहे. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक आणि धार्मिक काम काम हातून घडेल दान धर्म होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे पूर्ण करा

मीन - कोणालाही पैसे उसने देताना विचारपूर्वक द्या. आरोग्याची काळजी घ्या. खाण्या पिण्यावर लक्ष असू द्या. आर्थिक आवक चांगली असणार आहे.मना वरचा ताण कमी होईल.

Iran War Impact : मध्यपूर्वेतील संघर्षातही देशात LPG पुरवठा सुरळीत; केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांना दिलासा; मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या जाहीर, पाहा वेळापत्रक

आखाती संघर्षाचा मच्छीमारांना फटका; 'बल्क कन्झ्युमर' वर्गीकरणामुळे संताप; डिझेल दरवाढीने मासेमारी व्यवसाय ठप्प

माथेरान 'मिनी ट्रेन'च्या फेऱ्या घटल्याने पर्यटक नाराज; 'मोटारकार' सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी

Mumbai : सिग्नलवरील मुलांसाठी आशेचा किरण! चेंबूरमध्ये 'सिग्नल स्कूल'ची सुरुवात, महापौरांच्या हस्ते उद्घाटन