आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १८ जुलै २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, July 18, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष :आपल्या कामामध्ये एकाग्रता असू द्या. परिस्थितीनुसार आपल्या विचारांची दिशा बदलावी लागणार आहे. कोणत्याही गोष्टीची खातरजमा केल्याशिवाय पुढील पाऊल टाकू नका.

वृषभ : घेतलेली कामे जबाबदारीने पूर्ण कराल.आपल्या कार्यक्षेत्रात दीर्घकालीन विकास योजनांचा अवलंब करणे, आपणास लाभकारक ठरणार आहे .कौशल्याने काम करणार आहात.

मिथुन : काही घटना कामांमध्ये आपणास मनस्ताप होण्याचा संभव आहे. भावनाविवश होऊन कर्तव्यापासून विचलित होऊ नका. राहा एखाद्या लहान कार्यासाठी जास्त वेळ द्यावा लागणार आहे.

कर्क : आजचा दिवस प्रगतीचा चढता आलेख आसणार आहे.नोकरी-व्यवसायात तुमच्या कर्तुत्वाने नावलौकिक होईल. कोणत्याही आमिषाला बळी न पडता लाभाचे मार्ग स्वीकारू नका.

सिंह : व्यापार-व्यवसायात म्हणजे काही नवीन योजना कार्यान्वित करण्याचा विचार असणार आहे. त्यासाठी आपणास सातत्याने काम करावे लागणार आहे. आपल्या स्वतःच्या प्रगतीचे मार्ग दिसू लागतील.

कन्या : नोकरीत प्रगतीचे योग आहेत. नवीन काम हाती घेताना योग्य व्यक्तीचा सल्ला घेणे आवश्यक आहे. भावंड तुमच्या मदतीला येणार आहे. कोणाशीही चर्चा करताना विचारपूर्वक करणे आवश्यक आहे.

तुळ : बऱ्याच गोष्टी सुखवाह होणार आहेत. आर्थिक व्यवहार तज्ञांच्या सल्ल्याने घेतल्यास फायदेशीर ठरेल. आपल्या हातून समाजामध्ये काही बऱ्यापैकी कामगिरी पार पडेल .

वृश्चिक : व्यापार-व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. थोरा थोरा मोठ्यांचे परिचय होणार आहेत. तुमचा इतरांवर प्रभाव राहणार आहे. जिद्द व चिकाटी वाढणार आहे.

धनु : महत्वाची कामे पुढे ढकलावे. आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहे. नोकरी व्यवसायामध्ये जास्तीचे काम असल्यामुळे मनावर ताण येण्याची शक्यता आहे. वाद-विवादा पासून लांब राहणे चांगले .

मकर : आपण जसा दिवस ठरवला आहे, त्याच प्रमाणे जाणार आहे. आर्थिक विवंचना दूर होणार आहे. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. व्यापार-व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घेणार आहात.

कुंभ : व्यापार व्यवसायामध्ये मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रकारचा धोका स्वीकारू नका. आपल्या निर्णयासाठी आपण आपल्या ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेतल्यास योग्य ठरणार आहे.

मीन : ठरवलेल्या गोष्टी चिकाटीने करत राहणार आहात. कामाचा पसारा वाढणार आहे. सामाजिक क्क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे. प्रवासामुळे फायदे होतील.

‘फोडा आणि राज्य करा’ हीच संस्कृती

"२० जुलैपर्यंत जिवंत राहीन, नाहीतर भूत बनून परत येईन"; सोनम वांगचुक उपोषणावर ठाम

कल्याण-सीएसएमटी लोकलमध्ये डोंबिवलीहून 'डाउन' प्रवासामुळे राडा; महिलेने थेट पेपर स्प्रे फवारला

Mumbai : प्रस्तावित 'रेल्वे टर्मिनस' लटकले; रेल्वे, संरक्षण मंत्रालयात जमिनीचा वाद

Mumbai : आता कोस्टल रोडमध्ये बहुभाषिक फलक