कल्याण-सीएसएमटी लोकलमध्ये डोंबिवलीहून 'डाउन' प्रवासामुळे राडा; महिलेने थेट पेपर स्प्रे फवारला

कल्याणहून सकाळी ८.३३ वाजता सुटलेल्या सीएसएमटी जलद लोकलच्या महिला प्रथम श्रेणी डब्यात ही घटना घडली.
कल्याण-सीएसएमटी लोकलमध्ये डोंबिवलीहून 'डाउन' प्रवासामुळे राडा; महिलेने थेट पेपर स्प्रे फवारला
कल्याण-सीएसएमटी लोकलमध्ये डोंबिवलीहून 'डाउन' प्रवासामुळे राडा; महिलेने थेट पेपर स्प्रे फवारला'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुंबई : लोकलमधील सीटवरून होणारे वाद दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून, किरकोळ कारणांवरून प्रवाशांमध्ये हाणामारीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. विशेषतः डोंबिवलीहून कल्याणपर्यंत प्रवास करून काही महिला पुढील प्रवासासाठी जागा अडवून बसत असल्याने कल्याण स्थानकावरून चढणाऱ्या प्रवाशांमध्ये नाराजी वाढत आहे. अशातच गुरुवारी (दि.१६) कल्याण-सीएसएमटी जलद लोकलच्या महिला प्रथम श्रेणी डब्यात सीटच्या वादातून एका महिलेने सहप्रवाशांवर थेट पेपर स्प्रे फवारल्याने एकच खळबळ उडाली.

सीटवरून वाद, थेट पेपर स्प्रेची फवारणी

मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, कल्याणहून सकाळी ८.३३ वाजता सुटलेल्या सीएसएमटी जलद लोकलच्या महिला प्रथम श्रेणी डब्यात ही घटना घडली. डोंबिवलीहून आलेल्या काही महिला प्रवासी आधीच जागा अडवून बसल्या होत्या. कल्याण स्थानकावरून चढलेल्या महिलांनी त्यांना जागेवरून उठायला सांगितले. त्यावरून दोन्ही गटांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. काही क्षणांतच हा वाद विकोपाला गेला आणि डोंबिवलीहून प्रवास करणाऱ्या एका महिलेने पिशवीतील पेपर स्प्रे काढून सहप्रवाशांच्या दिशेने फवारला.

कल्याण-सीएसएमटी लोकलमध्ये डोंबिवलीहून 'डाउन' प्रवासामुळे राडा; महिलेने थेट पेपर स्प्रे फवारला
Kalyan : लोकलमध्ये हाणामारी! अंबरनाथ लोकलमध्ये सीटवर बसण्यावरून वाद; ३ जखमी, दोघे गंभीर, हातातील लोखंडी कड्याने हल्ला

डब्यात एकच गोंधळ

पेपर स्प्रेची फवारणी होताच महिला डब्यात एकच गोंधळ उडाला. काही प्रवाशांना डोळ्यांची जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. या घटनेची माहिती तातडीने रेल्वेच्या १५१२ हेल्पलाइनवर देण्यात आली. मात्र, ठाणे स्थानकावर पोलिस पोहोचण्यापूर्वीच लोकल पुढे निघून गेली.

सीएसएमटी येथे पोलिसांनी घेतले ताब्यात

लोकल सीएसएमटी स्थानकात पोहोचताच रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि रेल्वे पोलिसांनी दोन्ही गटांतील महिलांना ताब्यात घेतले. दोन्ही बाजूंकडून तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र, अखेरीस दोन्ही गटांनी सामंजस्याने वाद मिटवण्याचा निर्णय घेतला. एकमेकींची माफी मागत त्यांनी तक्रार नोंदविणे टाळले, अशी नोंद सीएसएमटी रेल्वे पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in