मेष - महत्त्वाच्या कामांना चांगल्या प्रकारे चालना मिळू शकेल. नोकरदारांना काहीसा दिलासा मिळेल कामाचा हुरूप वृद्धिंगत होईल आर्थिक बाजू मजबूत राहील खर्चावर व बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
वृषभ - सामाजिक कार्यात अग्रेसर राहाल. नोकरीमध्ये अनुकूलता अनुभवास मिळेल कामकाजात सफलता मिळेल आर्थिक बाजू चांगली राहील स्थावर बाबतचे प्रश्न सुटतील.
मिथुन - दैनंदिन कामात बर्यापैकी सुलभता जाणू शकेल. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल नोकरीचा प्रश्न सुटेल नोकरदारांना दिलासा मिळेल महत्त्वाच्या व्यक्तींच्या संपर्कात रहाल.
कर्क - आज आपल्याला भाग्याची साथ मिळाल्यामुळे महत्त्वाची कामे उरकून घ्या नोकरदारांना दिलासा मिळेल स्थावर बाबतचे प्रश्न सुटू शकतील विद्यार्थी वर्गाने परिश्रम याला अधिक महत्त्व द्यावे.
सिंह - आर्थिक परिस्थिती उत्तम राहिल्याने खर्च पण मनसोक्त कराल पण खर्चावर योग्य नियंत्रण ठेवण्याचे अपेक्षित गोष्टी साध्य करता येतील. नोकरीमध्ये आपल्या कामाची प्रशंसा होऊ शकते.
कन्या - एकूण सर्वच बाबतीत प्रयत्नशील राहिल्याने आवश्यक गोष्टी साध्य करता येतील हे विसरू नका वाहनाच्या वेगावर योग्य नियंत्रण आवश्यक.
तुळ - अपेक्षित कामे सुलभ होतील महत्त्वाच्या कामात बाहेरून मदत मिळू शकते सरकारी कामे विनाविलंब होतील नोकरदारांना नोकरीत मोठा दिलासा मिळेल.
वृश्चिक - कोणतेही बाबतीतील नकारात्मक विचार दूर ठेवल्यास व आत्मविश्वासाने निर्णय घेतल्यास यशाचा मार्ग सुलभ होईल नोकरदारांना नोकरीत मोठा दिलासा मिळेल.
धनु - नियोजनाद्वारे केलेले काम सफल होईल नोकरदारांना वरिष्ठांशी जुळवून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील राजकीय क्षेत्रातील मंडळींना हा काळ उत्तम राहील.
मकर - महत्त्वाच्या कामात समस्या येऊ शकतात परंतु आपले प्रयत्न कमी पडून देऊ नका वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. कुटुंबात किंवा आपल्या कार्यक्षेत्रात इतरांना दुखवू नका.
कुंभ - परिस्थितीनुसार विचार बदलण्याचे धोरण स्वीकारल्यास अपेक्षित गोष्टी साध्य होऊ शकतात त्याप्रमाणे प्रयत्न मात्र हवेत नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल उत्पन्न क्षेत्रात चढ-उतार राहतील.
मीन - नव्या योजना अमलात आणल्यास त्याचा लाभ घेता येईल नोकरदारांना नोकरीत मध्ये दिलासा मिळू शकतो वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.आपल्या आरोग्याची काळजी घ्या.