आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १९ डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, December 19, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आर्थिक परिस्थिती चांगली राहिल्याने मनासारखा खर्च करू शकाल. कुटुंबासाठी तसेच स्वतःसाठी नवीन वस्तू खरेदी करू शकाल.

वृषभ - सामाजिकतसेच धार्मिक कार्यात रस निर्माण होईल मानसन्मान मिळून सामाजिक ठिकाणी गौरव व कौतुक होईल. समारंभाला उपस्थित रहाल.

मिथुन - कुटुंबातील प्रिय व्यक्तींचे भाग्योदय होतील. स्वतंत्र व्यवसायिकांना मोठे धनलाभ होऊ शकतात नवीन फायद्याचे सौदे हाती येतील.

कर्क - समारंभा सारख्या कार्यक्रमात मान अपमानाचे नाट्य रंगून रंगाचा बेरंग होऊ शकतो. स्वतःच्या बोलण्यावरती नियंत्रण आवश्यक आहे.

सिंह - नोकरीत अनुकूल घटना घडतील मानसन्मान मिळेल मोठ्या व्यक्तिगत सुवार्ता मिळतील मात्र कलह जन्य परिस्थिती पासून जपा.

कन्या - गुरुकृपा लाभेल एखादी महत्त्वाची वार्ता समजेल परंतु हितशत्रू चा त्रास होऊ शकतो. आहारावर नियंत्रणाची गरज आहे.

तुळ - नोकरीसाठी दिलेल्या मुलाखतीतून यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी दिलासादायक वातावरण असेल. प्रवासाचे योग.

वृश्चिक - इतरांवर आपली मते लादू नका. खर्चाचे प्रमाण वाढलेले असेल. आरोग्याच्या जुन्या तक्रारी डोके पुन्हा वर काढू शकतात. सावध राहा.

धनु - वाहने चालविताना वाहनाच्या वेगावर ती नियंत्रण हवे. व्यावसायिकांना दिलासा मिळेल. नवीन योजनाअमलात आणू शकता.

मकर - नोकरी-व्यवसाय व धंद्यामध्ये दिलासादायक घटना घडून लाभाचे प्रमाण वाढेल, जुनी येणी येतील. वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करा.

कुंभ - मनाला समाधान देणार्‍या घटना घडतील. कुटुंबा एखादा धार्मिक कार्यक्रम कराल. आप्तेष्ट नातेवाईकांची भेट होईल. मार्गदर्शन मिळेल.

मीन - प्रेमात यश मिळेल आवडत्या व्यक्तीच्या सहवासात दिवस आनंदात जाईल. प्रवासाचे योग आहेत. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काम करा; अर्थमंत्री सीतारामन यांचे प्राप्तिकर विभागाला निर्देश

Nashik : भरधाव ट्रक फ्लायओव्हरवरून थेट ५० फूट खाली कोसळला; सिन्नरमधील भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल

महाराष्ट्रात ८७.७९ टक्के मतदार अर्जांचे वाटप पूर्ण; १ लाखाहून अधिक BLO कडून मतदार याद्यांचे पुनरीक्षण

Mumbai : तीन वर्षांची असताना गिळलं टोपण; टीबी-दमा समजून डॉक्टरांनी ७ वर्षे केले चुकीचे उपचार, अखेर मुलीच्या फुफ्फुसाचा भाग काढला

Mumbai : पोलिसांची गाडी रोखणाऱ्या 'त्या' तरुणीची सायबर सेलमध्ये धाव; ऑनलाइन छळ, अश्लील ट्रोलिंगविरोधात तक्रार