आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १९ जानेवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, January 19, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - अपेक्षित भेटीगाठी भेटी होणार आहेत. प्रियजनांचा सहवास लाभणार आहे. दैनंदिन कामे मार्गी लागतील.तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये नवीन नवीन संधी येण्याची शक्यता आहे.

वृषभ -आपली कामे चिकाटीने पूर्ण करावी लागणार आहेत. आपल्या आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत.आपल्या कार्यक्षेत्रात काम करताना मात्र दक्ष असणे आवश्यक आहे.

मिथुन -आपल्या बुद्धीच्या जोरावर आपल्या कार्यक्षेत्रात चांगले यश मिळेल. देवाणघेवाणीचे व्यवहार चांगले होतील. व्यापार व्यवसायातील लोकांना आजचा दिवस चांगला जाणार आहे.

कर्क - नोकरीमध्ये मनाजोगती कामे होणार आहेत. कामामध्ये आपल्याला सहकार्य मिळेल. कामाचे स्वरूप बदलल्यामुळे जास्त कामाची शक्यता आहे. मनोधर्य चांगले असणार आहे.

सिंह - कला क्षेत्रातील लोकांना सुसंधी लावणार आहे. नवीन निर्मितीचा आनंद घ्याल. आपली कामे दृढनिश्चयाने पूर्ण करणार आहात. कार्यक्षेत्रामध्ये मानसन्मान होण्याची शक्यता आहे.

कन्या - महत्त्वाच्या कामांमध्ये ज्येष्ठांचा सल्ला घेणे फार महत्त्वाचे आहे.आत्मविश्वासाने काम केल्यास कामे चांगली होणार आहेत. कौटुंबिक सौख्य लाभेल.आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत.

तुळ - नातेवाइकांच्या गाठीभेटी होणार आहेत. त्यांचे सहकार्य मिळणार आहे. कामांमध्ये महत्वाचे बदल चांगली होतील. प्रवासाची शक्यता आहे.

वृश्चिक - हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात चा अंदाज घेऊनच व्यवसाय वृद्धी करावी. नोकरीमध्ये सांगली संधी येणार आहे.आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे.

धनु - आर्थिक आवक चांगली राहणार असल्यामुळे खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.आपले मते इतरांना पटल्यामुळे आपल्याला आदर भाव मिळणार आहे.

मकर - मोठ्या गुंतवणुकीला लांबणीवर टाका. कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करताना योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. व्यापार-व्यवसायात वाढ करताना तज्ञांची मदत घ्यावी.

कुंभ - मित्र-मैत्रिणींच्या गाठीभेटी होणार आहेत.त्यांच्यासोबत मनोरंजनाचे कार्यक्रम आखण्याची शक्यता आहे.आपल्या कार्यक्षेत्रामध्ये अपेक्षित लाभ होणार आहेत.

मीन - आज आपल्या कलागुणांना चांगला वाव मिळणार आहे. नवीन काम करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहणार आहे व्यावसायिक व्यक्तींना पत प्रतिष्ठेचा लाभ होईल.

स्पेनमध्ये भीषण रेल्वे अपघात! दोन हाय-स्पीड ट्रेन एकमेकांना धडकल्या; २१ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Mumbai : ‘हॅलो!!! हॅलो!!! माईक चेक, माईक चेक’; BMC नगरसेवकांच्या स्वागतासाठी सज्ज; साडेतीन वर्षांनंतर होणार कामकाज

Mumbai : महिला नगरसेविकांच्या हाती BMC चा कारभार; सभागृहात ५० टक्क्यांहून अधिक महिलांची उपस्थिती

सिंधुदुर्गात राणे फॉर्म्युलाविरोधात राजीनामा सत्र सुरू; पक्षातील असंतोष उघडपणे बाहेर

Mumbai : नामनिर्देशित सदस्यत्वासाठी इच्छुकांकडून श्रेष्ठींची मनधरणी; सभागृहात आसन व्यवस्था मर्यादित