आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १९ नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, November 19, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - एखादी भाग्यकारक घटना घडून प्रसन्नता लाभेल. व्यवसायात वृद्धी होईल नफ्याचे प्रमाण वाढेल व्यवसायातील नवीन बदल व्यवसायास पोषक ठरतील. कुटुंबासाठी काही खरेदी कराल.

वृषभ - मनोबल जबूत करणाऱ्याा घटना घडतील. उत्साही आणि उमेदीने पुढील कामे पूर्ण कराल महत्वाची तसेच दीर्घकालीन रेंगाळलेली कामे मार्गी लागतील.

मिथुन - जमीन जुमला तसेच स्थावर संपत्ती याबद्दलची कामे गतीमान होतील. व्यवसाय धंद्यातील जुनी येणी वसूल होतील. आपणही आपली कर्जे चुकती करू शकाल.

कर्क - एखाद्या समारंभास उपस्थित राहावे. जुने मित्रमंडळी भेटतील. कौटुंबिक वातावरणात काही कारणामुळे कटकटी संभवतात. विशेषतः जीवनसाथी बरोबर वादविवाद टाळावेत.

सिंह - आरोग्य चांगले राहिले आणि आपल्या समोरील कामे धडाडीने आणि उत्साहाने पूर्ण करण्यात पुढे असाल. एखाद्या सामाजिक कार्यक्रमात भाग घ्याल. कौटुंबिक सुख लाभेल.

कन्या - आरोग्य चांगले राहील वैवाहिक सौख्य लाभेल. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे राहील इतरत्र वेळ वाया घालवू नये.

तुळ - उत्साह उमेद वाढवणाऱ्या घटना घडल्यामुळे आनंदी राहाल. कुटुंबामध्ये समज-गैरसमज यावरून कलह सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते.

वृश्चिक - व्यवसाय धंद्यात सुसंधी लाभतील. त्या संधीचा फायदा घेणे आपल्याच हाती आहे. योग्य निर्णय घेऊन पुढील पाऊल टाका. विद्यार्थ्यांना गुरुजनांचे मार्गदर्शन लाभेल.

धनु - महत्त्वाच्या कामांना विलंब लागू शकतो विशेषतः सरकारी कामे पुढे ढकलावी. ओळखी मध्यस्थी उपयोगी पडू शकतात शक्यतो प्रवास टाळावेत.

मकर - आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. हितशत्रू वर मात कराल. नोकरी व्यवसाय धंदा यानिमित्त जवळचे तसेच दूरचे प्रवास करावे लागतील. प्रवासात काळजी घेणे आवश्यक आहे.

कुंभ - कौटुंबिक वातावरण चांगले राहील. प्रेमात यश लाभेल तुमचे निर्णय अचूक ठरतील. कौटुंबिक दंत यात महत्त्वाच्या घटना घडू शकतात. सरकारी नियमांचे पालन करा.

मीन - कौटुंबिक सौख्य लाभेल. मुलांकडून त्यांच्या प्रगती पर वार्ता मिळतील. कुटुंबात एखादे मंगल कार्य करण्याचे नियोजन होईल. तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील.

मेट्रो-५ च्या कशेळी डेपोत पहिल्या गाडीचे आगमन; ठाणे-भिवंडी-कल्याणच्या प्रवाशांना मिळणार दिलासा

भारतातील युजर्ससाठी Apple Maps चे नवे फीचर्स; आता 3D लँडमार्कसह मराठीतही मिळणार रस्त्यांची माहिती, वाचा सविस्तर

कल्याण-डोंबिवलीत दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद

सोनिया गांधींच्या पुस्तकात सावरकरांच्या अपमानाचा दावा; पुस्तकाच्या प्रती फाडत शिंदेंच्या शिवसेनेकडून बंदी घालण्याची मागणी

रस्त्यावर पडलेल्या मद्यधुंद तरुणाच्या मदतीसाठी थांबलेल्या लोकांना भरधाव बसने उडवले; अपघात कॅमेऱ्यात कैद - VIDEO