आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २० जानेवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, January 20, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आपल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी संधी येणार आहे. आपण आपले काम नियोजन पूर्व व सातत्याने करणार आहात. काम चांगले झाल्यामुळे वरिष्ठांची मर्जी राहणार आहे.

वृषभ - व्यापार व्यवसाय मध्ये चांगले निर्णय घेणारा आहात.आपल्या कार्यक्षेत्रात तुमचं म्हणणे प्रत्येक व्यक्ती मनापासून ऐकेल.

मिथुन - इच्छा नसताना काही कामे करावी लागणार आहेत. मानसिकता खराब होण्याची शक्यता आहे.आवश्यकता नसताना जास्त विचार करू नका.

कर्क -आजच्या तुमच्या आनंदे वृत्तीमुळे कामाचा वेग वाढणार आहे. आवडत्या कामामध्ये काम करावयास मिळणार आहे. जोडीदाराचे आपल्याला सर्व प्रकारे साहाय्य लाभणार आहे.

सिंह - एखाद्या धुर्त व्यक्ती चा सामना करावा लागणार आहे. तुमची हुशारी पणाला लागणार आहे. नोकरी मध्ये समाधानकारक स्थिती असणार आहे. शत्रु काढण्याचा प्रयत्न करेल.

कन्या -आपल्या कार्यक्षेत्रात आपले निर्णय चांगली होणार आहेत. ऊर्जेची पातळी चांगली असणार आहे. मुलांच्या शिक्षणाच्या प्रगतीमुळे घरातील वातावरण आनंदी असणार आहे.

तुळ -आज शांततेत दिवस घालवण्याचा तुमचा मानस असणार आहे. जास्त धावपळ आणि दगदग नको वाटेल. कुटुंबासमवेत आनंद साजरा कराल.

वृश्चिक - नवीन कामासाठी परदेशातून शुभ संदेश देऊ शकतात.आपले निर्णय योग्य आहेत की नाही ते तपासा.बहिण भाऊ यापैकी कोणाला तरी आर्थिक मदत लागू शकते.

धनु - आज स्वतःसाठी वेळ द्यावा लागणार आहे. स्वतःसाठी मनन चिंतन करणे आवश्यक आहे. आपल्या बोलण्यातून गैरसमज होणार नाहीत याची काळजी घेणे फार गरजेचे आहे.

मकर - आपला कंटाळा जाणार आहे आजच्या दिवसात उत्साह वाढणार आहे सातत्याने केलेल्या कामाची फळे चांगली मिळतील सहकार्‍यांच्या संवादातून वेळेचा सदुपयोग होणार आहे.

कुंभ - देणे घेण्याचे व्यवहार चांगले सांभाळून केले पाहिजे. समोरच्या व्यक्तीसाठी विनाकारण खर्च करताना विचार करणे आवश्यक आहे. प्रवासात अडचणी येण्याची शक्यता.

मीन - आपल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रगती झाल्याने आपण आनंदी असणार आहात. आजच्या दिवशी आपणास जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे. संवाद साधणार आहात.

न्यूयॉर्कच्या लागार्डिया विमानतळावर भीषण अपघात! Air Canada Express विमानाची फायर ट्रकला धडक; दोघांचा मृत्यू, अनेकजण जखमी, VIDEO

Mumbai : सिग्नलवरील मुलांसाठी आशेचा किरण! चेंबूरमध्ये 'सिग्नल स्कूल'ची सुरुवात, महापौरांच्या हस्ते उद्घाटन

Mumbai : भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कायम; २५ हजारांवर कुत्र्यांचे निर्बीजीकरण; तरीही त्रास सुरूच

कच्च्या तेलाच्या आयातीचा खर्च वाढणार; इथेनॉल उद्योग २० टक्के मिश्रण पुरवण्यास सज्ज

दक्षिण मुंबईतील शौचालय प्रकल्प संशयाच्या भोवऱ्यात; महापालिका अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात