मेष - आपले मनस्वास्थ चांगले ठेवण्याची गरज आहे. व्यापार-व्यवसायात एखादी वाईट बातमी समजू शकते.सट्टेबाजारात सौदे करू नका नुकसान होण्याची शक्यता आहे.
वृषभ - तुमचे आपापसातले नातेसंबंध चांगले होणार आहेत. आपले विचार सकारात्मक असणार आहे. अनेकांना आपला सहवास हवाहवासा वाटेल.
मिथुन - शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस फारसा चांगला नाही. आरोग्याच्या तक्रारी आणि मानसिक तणाव जाणू शकतो.
कर्क -आपल्या अध्यात्मामध्ये प्रगती होणार आहे. आपल्या लेखनाची प्रशंसा होणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक यश मिळणार आहे. आपण पुढे जाणार आहात.
सिंह - आपल्या कुटुंबातील व्यक्ती आपल्या मताशी सहमत असणार आहेत. आपली काम करण्याची कपॅसिटी चांगली असणार आहे. व्यवसायातील अंदाज बरोबर ठरणार आहेत.
कन्या -कुठल्याही कामाची घाई गडबड करू नका. व्यक्तिगत आणि व्यावसायिक आघाडीवर आपण यश संपादन करणार आहात. आपल्याला कामासाठी प्रवास करावे लागण्याची शक्यता आहे.
तुळ -आपण नवीन मालमत्ता घेण्याचे ठरविले असेल तर त्यामध्ये यश येणार आहे. आपलीच कामाची तयारी असल्यास आपण नवीन योजना राबवू शकता. आपल्या कामामध्ये प्रगती होणार आहे.
वृश्चिक -आपण आज सकारात्मक वर आत्मविश्वास पूर्वक काम करणार आहात. संभाव्य परिस्थितीचा अंदाज घेऊनच मुक्तहस्ते खर्च करा.
धनु - आजचा दिवस आपल्यासाठी फार समाधान कारक नसणार आहे. आपल्या समोर अचानक मोठे खर्च उभे राहणार आहेत. उद्योग व्यवसायात किंवा कुठेही मोठा धोका स्वीकारू नका.
मकर -आजचा दिवस आपली इच्छापूर्ती आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा दिवस असणार आहे. प्रेमासाठी ही आजचा दिवस आपल्यासाठी चांगला आहे. नवीन ओळखी होतील.
कुंभ - कल्पक दृष्टिकोण आणि संधी यामुळे तुम्हाला अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या वरिष्ठांशी आणि अधिकाऱ्यांशी तुमचा सुसंवाद राहणार आहे.
मीन -आजूबाजूच्या लोकांना आपले मूल्य कळणार आहे. त्यामुळे तुम्ही आनंदित असणार आहात .आपल्या क्षमतेपेक्षा आपण जास्त काम करणार आहात. प्रवास करण्यास अत्यंत अनुकूल काळ आहे.