आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २१ जानेवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, January 21, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आपल्यामध्ये आत्मविश्‍वास व ऊर्जा भरपूर असणार आहे. नियोजनपूर्वक कामे केल्याने कामे चांगली होणार आहेत. आपल्या कामाचा दर्जा या जातीचे चांगला असणार आहे.

वृषभ - काज आपले कार्य चांगले होणार आहे. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घेतल्याने फायदेशीर ठरणार आहे. कामातील नियोजन चांगले असणार आहे. धार्मिक कामाला वेळ देणार आहात.

मिथुन - व्यवसायामध्ये आवक चांगली राहील. नोकरदारांनी प्रलोभनांपासून दूर राहणे फार आवश्यक आहे. अनपेक्षित खर्चाचे प्रसंग समोर येतील. कायदेशीर प्रकरणातून त्रास होऊ शकतो.

कर्क - प्रवासामधून फायदेशीर घटना घडतील.व्यवसायिक आवक प्रमाणापेक्षा कमी राहणार आहे. नोकरीत संमिश्र परिणाम मिळणार आहेत. ज्येष्ठ व्यक्तींबरोबर मतभेदाचे प्रसंग येतील.

सिंह - नोकरीमध्ये ठरवलेल्या कामामध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबी मध्ये बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे. वरिष्ठां मुळे मनस्तापाचे प्रसंग येण्याची शक्यता आहे.

कन्या - संततीच्या कामात सफलता मिळणार आहे. विद्यार्थ्यांना खूप परिश्रम घ्यावे लागतील. उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहणार आहे. कामामध्ये अपेक्षित सफलता मिळणार आहे.

तुळ - कुटुंबा कडे जास्त लक्ष देणे भाग पडणार आहे. अनपेक्षित समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. घरातील महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. नोकरीच्या प्रश्नातून मार्ग निघतील.

वृश्चिक - भावंडांच्या बाबतीत चांगल्या घटना घडतील. प्रवासामधून काळजी घेणे आवश्यक. मित्रमंडळींकडून अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. सरकारी कामासाठी संमिश्र रहाणार आहे.

धनु - कुटुंबा मधल्या समस्या संपणार आहेत. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण वाढणार आहे. नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होईल. योग्य मार्ग निघतील. उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहणार आहे.

मकर - आज आपले मनोबल चांगले राहणार आहे. मात्र नोकरीमध्ये नियोजन करून काम करावे अन्यथा ठरवलेली कामे होणार नाहीत. घरातील व्यक्तींचे सहकार्य लाभणार आहे.

कुंभ - काही व्यक्तींना मनाविरुद्ध प्रवासाचे प्रसंग येण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीमध्ये दूरदृष्टीचा विचार करणे फार आवश्यक आहे. मनस्तापाचे प्रसंग येण्याची शक्यता आहे.

मीन - आजचा दिवस आनंदात चालवण्याचा प्रयत्न करणार आहात. मात्र कामांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई करू नका. मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार आहे.

Thane : जेवणाच्या जास्त दराबाबत विचारणा महागात; भिवंडीच्या ढाब्यावर तरुणाला मारहाण, Video व्हायरल, पोलिसांनी घेतली दखल

'स्वत:चं मत कुठे गेलं?' ची पोस्ट व्हायरल; जळगावातील महिला उमेदवाराला खरंच शून्य मतं? जाणून घ्या सत्य

Mumbai : मुदतीआधीच बेलासिस उड्डाणपुलाचे काम फत्ते! मुंबई सेंट्रल, नागपाडा आणि ताडदेवमधील वाहतूककोंडी फुटणार

महाराष्ट्रात गुंतवणुकीचा ओघ; MMRDA कडून ९६ अब्ज डॉलरचे गुंतवणूक करार; ९.६ लाख रोजगारांची निर्मिती होणार

भाजप-शिंदेसेनेत रस्सीखेच; महापौरपद किंवा स्थायी समितीसाठी शिंदेसेना आग्रही; मुंबईचा महापौर दिल्लीतून ठरणार