मेष - आपला उत्साह योग्य कामासाठी वापरा. व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावा. आपले मनोबल उत्तम राहणार आहे. त्यामुळे कामाला गती प्राप्त होणार आहे.
वृषभ - आपल्या कार्यक्षेत्र साठी आपण नियोजनाला आज वेळ देणार आहात. नोकरीमध्ये पण चांगली परिस्थिती राहणार आहे. सुखसोयी मिळतील. आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे.
मिथुन - खूप घाईघाईने कमे करू नका. कामामध्ये चुका होण्याची शक्यता आहे. पर्यायाने कामाला विलंब होऊ शकतो आपण शांतपणे आणि विचारपूर्वक कामे केल्यास टारगेट पूर्ण होणार आहे.
कर्क - घरातील छोटे मोठे वाद विवाद मिटवा. जोडीदार काम करण्याच्या मूडमध्ये नसणार आहे. जोडीदारास मदत करावी लागणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये वाढ होईल.
सिंह - नोकरी व्यवसायामध्ये कामाचे प्रमाण वाढणार आहे. आपणास कर्मचारी वर्गाचे सहकार्य मिळणार आहे. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. हित शत्रूवर मात होईल.
कन्या - नोकरीन मधील तणाव कमी होणार आहे. तरीसुद्धा संघर्षमय परिस्थिती असणारच आहे. आपले वर्चस्व असणार आहे. पैशांची आवक चांगली होईल. खर्च मात्र होणार आहे.
तुळ - कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य देणार आहात. त्यामुळे तुम्हाला आत्मिक समाधान मिळेल. नोकरदारांना दिलासा आहे. बौद्धिक - क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगला दिवस.
वृश्चिक - नियमांचे कटाक्षाने पालन करणे आवश्यक आहे. कोणत्याही कार्यात साहसी वृत्ती दाखवण्याचे टाळा. विरोधकांच्या कारवायांवर लक्ष ठेवा. कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा ठेवू नका.
धनु - आर्थिक व्यवहार सावधानतेने करा. येणाऱ्या समस्यांना धैर्याने सामोरे जाल. बोलण्यापूर्वी काय योग्य काय योग्य आहे याचा विचार - करा. वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा.
मकर - नोकरदारांना दिलासा मिळणार आहे. आर्थिक बाजू सावरता येणार आहे. कला क्षेत्रात चमकण्याची संधी मिळेल. आप्तेष्ट, मित्रमंडळी मंडळी यांच्याशी सौहार्दपूर्ण वागणे हितकारक आहे.
कुंभ - घरात उत्तम घटना घडतील. नवीन घटनांना आनंदाने सामोरे जाल. चांगल्या बातम्या ऐकावयास मिळतील. घरातील संघर्ष - मिटणार आहे. धार्मिक कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल.
मीन - कामाचा उत्साह व राहणार आहे. आपणास अपेक्षित यश मिळणार आहे. आपण समाधानी असाल. नोकरीमध्ये जरी काम जास्त असले तरी सुद्धा वातावरण चांगले असणार आहे.