आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २४ जानेवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, January 24, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष -आज आपली कामे दुपारपर्यंत करून घ्या.मुख्य म्हणजे आर्थिक कामे केल्यास आर्थिक प्राप्ती होईल उधारी वसूल होण्याचा दिवस आहे.

वृषभ - आज आपले देव आपल्या बाजूने आहे लक्षात ठेव महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या नवे करार नवे संकल्प आपल्या मनासारख्या होतील.

मिथुन - सरकारी कामांना प्राधान्य द्या. वरिष्ठ वर्गांशी चांगले संबंध ठेवा. आपल्या अधिकारांचा योग्य वापर केल्याने मान सन्मानात वाढ होईल. वरिष्ठ व्यक्तीचे सहकार्य मिळेल.

कर्क -आपल्या कामांमध्ये प्रगती होणार आहे . प्रतिष्ठित व्यक्तींशी संबंध येणार आहे त्यांचे आपणास सहकार्य लाभणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीचा दिवस आहे.

सिंह -आज आपण थोडे आक्रमक असाल. काही धाडसी निर्णय घेण्याची शक्यता आहे. मानसिकता सांभाळा. वादविवादाची शक्यता. त्यामुळे आपण अडचणीत येण्याची शक्यता आहे.

कन्या -आपल्या कार्यक्षेत्रात जास्त काम करावे लागणार आहे. काम फक्त नियमित करणे आवश्यक आहे. कौटुंबिक आयुष्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

तुळ - आजचा दिवस तुम्हाला फारसा अनुकूल नाही. नोकरीमध्ये ताण असण्याची शक्यता आहे. काम नियोजनपूर्वक करा ताण कमी होईल. सहकारी व्यक्तींशी गोड बोलून सहकार्य मिळवा.

वृश्चिक - तुमच्या मित्रांची संख्या वाढणार आहे.अचानक होणारा प्रवास तुम्हाला फलदायी ठरणार आहे.आपल्याला दान धर्म करावासा वाटेल. हा काळ आपल्यासाठी अनुकूल असणार आहे.

धनु - आपल्या आजूबाजूचे वातावरण अतिशय चांगले असणार आहे. आपल्या समस्या आपोआप सोडवल्या जातील. आपल्या घरातील व्यवहार चालू राहणार आहे.

मकर - शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस आपणास चांगला जाणार आहे. मानसिक तणावही आपला कमी होणार आहे.

कुंभ - आजचा दिवस आपणास अत्यंत उत्पादनक्षम असणार आहे. आपले जे ध्येय गाठायचे आहे त्यामध्ये आपणास समाधान मिळणार आहे.

मीन -आज आपणास संपूर्ण दिवस मिश्र स्वरूपाचा जाणार आहे. दुपारपर्यंत असलेली मरगळ नंतर अचानक दूर होऊन आपण आनंदी होणार आहात.

Iran War Impact : मध्यपूर्वेतील संघर्षातही देशात LPG पुरवठा सुरळीत; केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांना दिलासा; मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या जाहीर, पाहा वेळापत्रक

आखाती संघर्षाचा मच्छीमारांना फटका; 'बल्क कन्झ्युमर' वर्गीकरणामुळे संताप; डिझेल दरवाढीने मासेमारी व्यवसाय ठप्प

माथेरान 'मिनी ट्रेन'च्या फेऱ्या घटल्याने पर्यटक नाराज; 'मोटारकार' सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी

Mumbai : सिग्नलवरील मुलांसाठी आशेचा किरण! चेंबूरमध्ये 'सिग्नल स्कूल'ची सुरुवात, महापौरांच्या हस्ते उद्घाटन