आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २४ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, September 24, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - समाजातील मान्यवर व्यक्तींच्या भेटीमुळे दिवस साजरा होईल आपल्या स्वप्नांमध्ये रमून जाल. काही महत्त्वाची कामे हातावेगळी कराल मनासारख्या घटना घडतील.

वृषभ - प्रेमात यश संपादित करू शकाल संतती सौख्य लाभेल आर्थिक लाभ होतील आपला इतरांवर प्रभाव राहील व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल.

मिथुन - आरोग्य उत्तम राहील लहान-मोठ्या प्रवासाचे योग, प्रवास कार्यसिद्धी होतील. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी निवड होईल.

कर्क - आज संमिश्र फळे मिळतील.वाहन चालवताना वाहनाच्या वेगावर ती नियंत्रण हवे तसेच कुटुंबात व मित्रमंडळींच्या वर्तुळात वाद-विवाद टाळावा.

सिंह - समाजातील थोरामोठ्यांच्या ओळखीतून लाभ मिळेल काहींना वास्तु योग. व्यवसायिक स्थिती समाधानकारक राहील. नोकरीमध्ये राजकारणापासून अलिप्तरहा.

कन्या -विवाह ठरण्यासाठी मधील अडचणी दूर होतील कुटुंबातील तरुण-तरुणींच्या कडून मनाला समाधान देणाऱ्या बातम्या मिळतील संतती सौख्य लाभेल.

तुळ - मुर्खांच्या नंदनवनात रमू नका व्यवसायातील उलाढाल वाढून नफ्याचे प्रमाणात वाढ झालेली दिसेल स्पर्धकांवर मात कराल अपघातापासून जपा. काळजी घेतलेली हितकारक राहील.

वृश्चिक - कौटुंबिक आघाडीवर अप्रिय घटना घडण्याची शक्यता. मुला मुलींकडून काही चिंताक्रांत करणाऱ्या वार्ता समजतील मात्र व्यवसायिक परिस्थिती समाधानकारक राहील.

धनु - स्वतःच्या मालकीचे घराचे स्वप्न पूर्ण होईल त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास यशस्वी होतील पैशांची सोय होईल कौटुंबिक वातावरण उत्तम राहील चांगल्या वार्ता समजतील.

मकर - काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील त्यात काही वेळेस अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे पण त्यातून मार्ग निघू शकतो कार्यक्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळेल

कुंभ - आपल्या समोरील कामांमध्ये कार्यमग्न राहाल कलाकार व साहित्य क्षेत्रातील मंडळींना यश आणि प्रसिद्धी मिळेल नोकरीमध्ये वरिष्ठांशी बोलताना योग्य शब्दांचा वापर करा.

मीन - नशिबाची साथ मिळाल्याने यशाची वाटचाल करणे सुलभ होईल विरोधकांवर विजय मिळवाल येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढलंएखाद्या धार्मिक कार्यात सहभागी होता येईल.

अमेरिकन निर्बंधांमुळे भारतापुढे तीन कठीण पर्याय

मशरूम फक्त चविष्ट नाही, पौष्टिकही! आहारात समावेश केल्यास मिळतील 'हे' फायदे

देशात सर्वात कोरडा मान्सून; एल-निनोचा फटका; सरासरीपेक्षा १५ टक्के कमी पाऊस

Mumbai : फेरीवाल्यांवरील कारवाईत समन्वयाचा अभाव; विधी समितीत हरकतीचा मुद्दा

Mumbai : खारमधील पुनर्विकासाला मंजुरी; रामकृष्णनगरच्या रहिवाशांना मिळणार मोठी घरे