मेष - आजचा दिवस फारसा आपणास अनुकूल नाही.आपण आपल्या जीवनाकडे फार सकारात्मक दृष्टीने बघणार नाही. कोणत्याही क्षेत्रात नुसते अंदाजावरून काम करू नका.
वृषभ -आजचा दिवस आपणास आनंदाचा आहे मैत्रीचे संबंध वाढणार आहेत अनेकांना आपला सहवास हवाहवासा वाटणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये आर्थिक लाभ होतील.
मिथुन -आपला स्वभाव जुळून घेण्या चा आहे. समोरच्याकडून आपल्याला काय फायदा आहे याचे आकलन आपल्याला निश्चितच चांगले होते.
कर्क -आपली निर्णय घेण्याची क्षमता आणि तारतम भाव जाणण्याची क्षमता अतिशय उत्तम आहे. त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम निर्णय होणार आहेत.
सिंह -आज आपल्याला आपला आत्मविश्वास कमी झाल्यासारखा वाटणार आहे पण सकारात्मक विचार आणि कामात व्यग्र ठेवणे आवश्यक आहे. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.
कन्या - आपल्या कार्यक्षेत्रात छोटे मोठे बदल होण्याची शक्यता आहे. ते आपणासाठी लाभकारक आहेत. भागीदाराच्या व्यवसायात आपणास चांगला फायदा होणार आहे.
तुळ - व्यवसायासाठी आपणास कर्ज हवे असल्यास ते आपणास मिळू शकते.आज आपणाला जास्त काम असणार आहे. हाताखालील व्यक्तींची मदत घ्यावी लागणार आहे.
वृश्चिक -वैवाहिक जीवनासाठी आजचा दिवस अतिशय अनुकूल आहे. संतती कडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. लेखक कवी यांच्या लिखाणाची प्रशंसा होईल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक यश मिळेल.
धनु - कुटुंबामध्ये एकोपा राहील याची आपण काळजी घेणार आहात. घरातील महत्त्वाच्या व वस्तूंची खरेदी विक्री होण्याची शक्यता आहे. त्यात आपणाला फायदा मिळेल.
मकर - नातेवाईकांशी संबंध चांगले ठेवण्याचे प्रयत्न करा. आपला व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टिकोनातून चांगले संदेश मिळणार आहेत. त्यादृष्टीने कामाचे नियोजन चांगल्या प्रकारे कराल.
कुंभ - आपले महत्वाचे कार्य आज सहजरीत्या होणार आहे.घरातील वातावरणही आनंदी असणार आहे. घरातल्यांचे सहकार्य आपणास मिळणार आहे.
मीन - दीर्घकालीन योजना तूर्तास थांबून ठेवा. आपल्याकडे जे उत्पन्नाचे स्त्रोत आहेत त्यातूनच उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करा. शक्यतो प्रवास टाळणे चांगले. दुसऱ्या वर जास्त विश्वास ठेवू नका.