आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २५ डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, December 25, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - सामाजिक कार्यात भाग घ्याल लोकांसाठी खर्च कराल मित्र मंडळीच्या वर्तुळात कोणाला तरी आपल्या मदतीची गरज भासू शकते. कौटुंबिक सुख मिळेल.

वृषभ - आप्तेष्ट नातेवाईक यांची गाठीभेटी होतील. कुटुंबात एखाद्या धार्मिक कार्यक्रमा निमित्त सर्वांची भेट होईल. दिवस आनंदात जाईल.

मिथुन - जुने मित्र मैत्रिणी भेटतील. नवीन लोकांच्या ओळखी होतील. या ओळखींचा उपयोग आपली जुनी कामे पूर्ण करण्यासाठी होऊ शकेल.

कर्क - भाग्याची साथ मिळाल्यामुळे अवघड कामे होतील महत्त्वाचा गाठीभेटी पूर्ण होतील धनलाभाचे योग. कुटुंबात आनंदी वातावरण याचा लाभ मिळेल.

सिंह - एखाद्या सामाजिक समारंभास उपस्थित राहावे तेथे एखादे मानाचे पद भूषण उशकाल. कौटुंबिक समाधान मिळेल. मुलांकडून शुभवर्तमान समजेल.

कन्या - अपेक्षित पत्रव्यवहार साध्य होईल. प्रवासाचे योग. सहकुटुंब सहपरिवार एखाद्या धार्मिक पवित्र स्थळी भेट द्याल. गुरुकृपा मिळेल.

तुळ - अचानक धनलाभ होण्याची शक्यता. पूर्वी घेतलेल्या कष्टाचे फळ मिळेल. नवीन कामे मिळू शकतात. समाधानी राहाल.

वृश्चिक - एखाद्या विषयात आपल्या धाडसी निर्णयामुळे आपल्याला फायदा होईल त्याच प्रमाणे आपल्या शब्दाला प्राधान्य मिळेल.

धनु - समाजातील गुरुतुल्य व्यक्ती भेटतील त्यांच्या विचारांनी आपण प्रभावित व्हाल. अध्यात्मिक व धार्मिक कार्यात सक्रिय योगदान द्याल.

मकर - महत्त्वाची व मोठी कार्य गतीमान होतील जमीनजुमल्याच्या संदर्भातील व जमिनी विषयक व्यवहार पूर्ण होण्याच्या मार्गावर असतील.

कुंभ - कुटुंबातील सदस्यांच्या सर्व गरजा पूर्ण करू शकाल अर्थ मान चांगले राहील घरातील लोकांबरोबर उत्तम काळ घालवाल. शुभवार्ता मिळतील.

मीन - मनोरंजनाकडे कल असेल. मित्रमंडळींच्या बरोबर आनंदात वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रिय व्यक्तींचा सहवास मिळेल.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग