मेष : विविध मार्गांनी धनलाभ झाल्यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली राहील परंतु खर्चावर नियंत्रण ठेवा. काहींना दूरचे प्रवास करावे लागतील. धार्मिकतेकडे कल राहील.
वृषभ : प्रवासाचे योग आहेत. खर्चाचे प्रमाण वाढत जाईल. आर्थिक आवक मनासारखी राहील. नोकरीत नवीन जबाबदारी पत्करावी लागेल. प्रगती होईल. काहींना उच्चधिकार मिळू शकतात.
मिथुन : अनुकूलता लाभलेला हा दिवस राहील. भाग्याची उत्तम साथ आपल्याला राहणार आहे. प्रवासाचे योग आहेत. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. काहींची बदली होऊ शकते.
कर्क : कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. भाग्याची साथ राहील. प्रवासात थोडी दगदग होऊ शकते. नोकरीमध्ये बदलीची शक्यता. स्थावर जमीन जुमला यांची कामे मार्गी लागतील.
सिंह : अनेक कामे मार्गी लागतील. नोकरीमध्ये चांगल्या संधी चालून येतील. आपल्या व्यक्तिमत्त्वाला उजाळा मिळेल. अनेक घटनांच्या केंद्रस्थानी आपण राहाल.
कन्या : कौटुंबिक सुख मिळेल. जीवनसाथी आपले संबंध अतिशय मधुर राहतील. प्रेमीजनांना उत्तम काळ भेटवस्तूंची देवाणघेवाण होऊ शकते. प्रवास शक्यतो टाळलेला उत्तम.
तुळ : अनेक मार्गांनी धनप्राप्ती होईल. त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत राहील. मात्र खर्चाचे प्रमाणात वाढ होईल. नोकरीत प्रगतीचे योग. जोडीदाराशी थोडा वाद होऊ शकतो.
वृश्चिक : नोकरी व्यवसाय धंदा यामधील परिस्थिती समाधानकारक राहील. आर्थिक आवक मनासारखी राहील. नोकरीमध्ये बढतीचे योग. नवीन नोकरीचा शोध यशस्वी होईल.
धनु : नोकरीत कामाचा ताण जाणवेल. पण केलेल्या कष्टाचे फळ मिळेल. नोकरीत बढतीची शक्यता. पण बदलीची तयारी ठेवावी लागेल. जोडीदाराची उत्तम साथ आपल्याला राहील.
मकर : इतरांशी गोड बोलून आपली कामे करून घ्या. मुत्सद्दीपणाने वागावे लागेल. कामामध्ये थोडे बदल होऊ शकतात. मनासारखे खाणे-पिणे मिळेल. अनेकांना प्रवासाचे योग.
कुंभ : रागावर नियंत्रण महत्त्वाचे राहील. तडकाफडकी निर्णय घेणे किंवा कोणालाही टाकून बोलणे तसेच कोणालाही अपमानास्पद वागणूक देणे टाळा. शिस्त पाळा.
मीन : तरुण-तरुणींना प्रेमात यश लाभून आपला आवडता जीवनसाथी निवडता येईल. प्रेमामध्ये यश मिळेल. धार्मिक कार्यक्रमांमध्ये तसेच सामाजिक कार्यक्रमात सक्रिय भाग घ्याल.