आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २६ जानेवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, january 26, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - कुटुंबातील सदस्यच्या आरोग्याच्या तक्रारी मुळे चिंताग्रस्त राहणार आहात. अनावश्यक खर्चाची शक्यता असल्याने या संदर्भात आपण काळजी घेतलेली चांगली. निर्णय शक्ती कमी होणार आहे.

वृषभ - आपली काम करण्याची क्षमता चांगलीच आहे. मात्र आज आपल्यामध्ये उत्साह आणि चैतन्य असणार आहे. आपण पूर्णपणे आपल्या कार्यक्षमतेवर काम करणार आहात.

मिथुन - आज आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी भरपूर कालावधी मिळणार आहे. आपणास धावपळ करावी लागणार आहे. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा. कार्यक्षेत्रात चांगली प्रगती कराल.

कर्क - आजचा दिवस अतिशय चांगला जाणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये चांगल्या संधी येणार आहे. चांगल्या लोकांचे सहकार्य मिळणार आहे. प्रवासात फायदे होतील.

सिंह - आजचा दिवस आपला संमिश्र घटनांचा असणार आहे. आपणास मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काही अडचण येण्याची शक्यता आहे.

कन्या - आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या बाकी दरांमुळे आपल्याला अडचणी अडथळे येण्याची शक्यता आहे त्यांच्यावर अवलंबून न राहता, स्वतः व्यवसायात लक्ष घाला. आर्थिक नुकसान टळेल.

तुळ - आज आपणाला विपरीत परिस्थितीत काम करावे लागणार आहे. मानसिक अवस्था चांगली ठेवा. विनाकारण वाद विवाद होऊ शकतात. शत्रु विनाकारण त्रास देण्याची शक्यता आहे.

वृश्चिक - आपल्या कार्यक्षेत्रात आपण चांगली भरारी मारणार आहात. आपल्या कार्यक्षमतेने मुळे प्रगती होणार आहे. आपल्या हातून चांगली कामे होणार आहेत. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे.

धनु - आज आपले मन शांत व स्थिर असणार आहे. आपल्या मालमत्तेवर विषयी काही कामे असल्यास ती पुढे सरकतील. घरातील ज्येष्ठ मंडळींचे आपल्याला सहकार्य असणार आहे.

मकर - विपरीत परिस्थिती सुद्धा चांगल्या प्रकारे आपण काम हाताळू शकाल. आपल्या भावंडांचे आपले मतभेद होण्याची शक्यता आहे. आपल्या आरोग्याच्या थोड्याफार कुरबुरी असू शकतात.

कुंभ - आजच्या दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. हातून सत्कार्य होणार आहे. आज आपण आनंदी असणार आहात. कौटुंबिक सौख्य चांगल्याप्रकारे मिळणार आहे.

मीन - आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपले मूल्य पडणार आहे. तुमच्या छंदासाठी तुमचे मित्र आणि सहकारी मदत करतील. आपल्या कार्यक्षेत्रात नवीन नवीन संधी येण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Update : राज्यात १७ ते २० मार्चदरम्यान वादळी पावसाचा इशारा

देशात एलपीजी, पेट्रोल, डिझेलची कमतरता नाही; केंद्राची पत्रकार परिषदेत माहिती

भारताला होर्मुझमधून सुरक्षित मार्ग देऊ; इराणने मैत्रीखातर दर्शवली तयारी

Mumbai : पायाभूत प्रकल्पांसाठी FD मोडून १२ हजार कोटींची तरतूद; उदय सामंत यांची माहिती

'रील्स'ची नशा आपला घात करणार