आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २८ जुलै २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, July 28, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - अपेक्षित फलप्राप्ती करून घेऊन शकाल. उत्साहात भर पडणार आहे. काही महत्त्वाच्या कामात यशाचे माप तुमच्या पदरात पडणार आहे. विरोधकांवर मात करण्यास अडचणी येणार नाहीत.

वृषभ - परिश्रमाला पर्याय नाही हे आपण जाणतोच, आपले इप्सित साध्य करण्यासाठी अंगी असलेले बळ व चातुर्य वापरावे लागणार आहे. अनावश्यक खर्च टाळावा. दविवादात पडू नका.

मिथुन - नात्यातील प्रेमळ धागाच जपला तर आपल्यासाठी ते फायद्याचेच आहे. थोरामोठ्यांच्या सल्ल्याने कार्य सिद्धितील अडचणी व त्रास कमी होणार आहे.

कर्क - कौटुंबिक जीवनात सामंजस्याचे धोरण अवलंबावे लागणार आहे. मनाविरुद्ध घडणाऱ्या लहानसान घटनांना अधिक महत्त्व देऊ नका. आपले मार्गक्रमण करत राहा. काही निर्णय चांगले होणार आहेत.

सिंह - व्यापार व्यवसायाच्या विस्ताराच्या संधी चालून येणार आहेत. कौटुंबिक स्नेहसंबंध जोपासण्यास तुम्हालाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. प्रवासातून फायदा होण्याची शक्यता आहे.

कन्या - आपले तेच खरे असे वागू नका, त्याचा त्रास आपणाला होणार आहे. प्रसंगी दोन पावले मागे येणे कधीकधी हिताचे ठरते. नोकरी व्यवसायात प्रगती साठी केलेल्या प्रयत्नांना चांगले यश मिळेल.

तुळ - वातावरण आनंदी राहणार आहे. मानसन्मानाचे प्रसंग संभवतात. छोट्या-मोठ्या मतभेदाच्या प्रसंगांना सामोरे जावे लागणार आहे. धनप्राप्ती चांगली होणार आहे.

वृश्चिक - आपल्या खर्चाच्या बाबतीत अंदाज चुकू शकतात. खर्च करताना विचारपूर्वक करणे आवश्यक आहे. धावपळ आणि दगदग होण्याची शक्यता आहे. तब्येतीकडे दुर्लक्ष नको.

धनु - दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वकर्तृत्वावर अधिक भर दिला तर सरशी तुमचीच आहे. महत्त्वाची कामे पार पडणार आहे. संवादातून आर्थिक प्रगती साधता येणार आहे.

मकर - आपण केलेल्या श्रमाचा आपणास फायदा मिळणार आहे. वरिष्ठांच्या मर्जीने अधिकारात वाढ संभवते. धनप्राप्ती मनाजोगती असेल. कायद्यांचे उल्लंघन करू नका.

कुंभ - आपल्या कार्यक्षेत्रात तुम्ही स्वतःच्या कर्तबगारीचा ठसा उमटवणारा आहात. सामाजिक बांधिलकी समजून सामाजिक क्षेत्रात चांगले काम करणार आहात.

मीन - आलेल्या अडचणींकडे संधी म्हणून पहा. अडचणींना सकारात्मकतेने सामोरे जा. नोकरदारांनी नियमांची चौकट मोडून नये. निर्णय प्रक्रियेत घाई नको.

बळीराजाला आधार, शेतीला नवी उभारी

सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काम करा; अर्थमंत्री सीतारामन यांचे प्राप्तिकर विभागाला निर्देश

Nashik : भरधाव ट्रक फ्लायओव्हरवरून थेट ५० फूट खाली कोसळला; सिन्नरमधील भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल

महाराष्ट्रात ८७.७९ टक्के मतदार अर्जांचे वाटप पूर्ण; १ लाखाहून अधिक BLO कडून मतदार याद्यांचे पुनरीक्षण

Mumbai : तीन वर्षांची असताना गिळलं टोपण; टीबी-दमा समजून डॉक्टरांनी ७ वर्षे केले चुकीचे उपचार, अखेर मुलीच्या फुफ्फुसाचा भाग काढला