आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २८ जून २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, June 28, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - लहान-मोठे प्रवास घडतील. धार्मिक कार्याच्या माध्यमातून प्रवास होऊ शकता. देवपूजेत मन रमू शकते दानधर्म घडेल महत्त्वाची कामे पार पाडू शकाल.

वृषभ - आर्थिक आवक चांगली राहील यामुळे मन समाधानी राहील विविध मार्गांनी धनप्राप्ती होऊ शकते नोकरीत सामान्य परिस्थिती राहील फार अपेक्षा ठेवू नये.

मिथुन - नोकरी अनुकूल संधी मिळेल मनासारखी बदली होईल परंतु जबाबदारी मध्ये वाढ होऊ शकते तसेच कामाच्या स्वरूपातही बदल होईल गृहसौख्य चांगले राहील.

कर्क - भाग्याची चांगली साथ राहील आपले निर्णय अचूक ठरवून त्याचा फायदा अनुभवता येईल पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास घडू शकतात नोकरीत मात्र वादाचे प्रसंग येतील ते टाळा.

सिंह - आर्थिक आवक चांगली राहील यामुळे आपले नियोजन उत्तम होईल महत्त्वाच्या कामांसाठी वेळ द्यावा लागेल आपण कौशल्याने परिस्थिती हाताळाल.

कन्या - प्रलंबित कामे पूर्ण होतील अडचणींचे प्रमाण कमी राहील तणाव दूर होतील जोडीदाराशी सुसंवाद ठेवणे आवश्यक आहे. आपल्या कार्यपद्धतीची प्रशंसा नोकरीत होईल.

तुळ - धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रमात सक्रिय योगदान द्याल. मित्रमंडळींबरोबर एखाद्या विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहाल.

वृश्चिक - चालू नोकरीत अधिकारांमध्ये वाढ होऊन जबाबदाऱ्यांमध्ये सुद्धा वाढ होईल. कार्यक्षेत्र विस्तारेल. जुने आजार नव्याने उभे राहण्याची शक्यता.

धनु - खर्चाचे प्रमाण वाढल्यामुळे योग्य त-हेने पैशाचा वापर करा कुटुंबासाठी विशेष खर्च करावे लागतील. अचानक पणे काही महत्त्वाची कामे खर्चिक ठरतील.

मकर - सकारात्मक विचारां च्या व्यक्ती भेटतील. नवीन ओळखी होतील योग्य विचारांची संगत लाभेल विनाकारण खरेदीचा मोह आवरा.

कुंभ - इतरांच्या भानगडीत पडू नका. गुंतागुंतीच्या कामात लक्ष दिल्यास स्वतःला त्रास होऊ शकतो काही महत्त्वाचे निर्णय अचानक घ्यावे लागतील.

मीन - कुटुंबामध्ये तसेच मित्र मंडळाच्या वर्तुळामध्ये वाद-विवाद यांची शक्यता असल्यामुळे कोणत्याही व्यक्तीशी जास्त वाद-विवाद करू नका. कौटुंबिक शांतता पाळा.

TET चाही पेपर फुटला; आज होणारी परीक्षा रद्द; मुख्य आरोपी अद्याप फरार

देशात तेलाचे दर कधी कमी करणार? काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा सवाल

Mumbai : मोहरम मिरवणुकीतील विषबाधेचा कट उघडकीस; पोलिसांची धडक कारवाई; १४,९०० विषारी कॅप्सूल जप्त

दादर कबूतरखाना 'अ‍ॅक्रेलिक शीट'ने होणार बंदिस्त; खाद्य टाकण्यास पूर्णतः प्रतिबंध; मुंबई महापालिकेचा निर्णय

रखडलेल्या पासपोर्टसाठी थेट 'वॉक-इन' सुविधा; ४५ दिवसांपेक्षा जास्त काळ प्रलंबित अर्जासाठी मोठा दिलासा; २ जुलैपासून नवीन सुविधेचा लाभ