आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २८ नोव्हेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, November 28, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आपल्या कामातील प्रयत्नांना चांगले यश मिळणार आहे. परदेशातून काही शुभ संदेश येण्याची शक्यता आहे. नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर चांगले यश येईल.

वृषभ - आर्थिक प्रश्‍न सुटणार आहेत. आपण घेतलेल्या निर्णयात कुटुंबीय आपणाशी सहमत असणार आहेत. घरात पाहुणे येण्याची शक्यता आहे त्यांचा पाहुणचार आदरतिथ्य चांगले कराल.

मिथुन - व्यापार व्यवसायात लक्ष देणे फार गरजेचे आहे. आपणाला कामाच्या नवीन संधी येण्याच्या शक्यता आहे. संधीचा फायदा घेण्यासाठी विचारपूर्वक निर्णय घेणे फार आवश्यक आहे.

कर्क - आजचा दिवस आपणासाठी फार अनुकूल नाही. कामाचा दबाव खूप असणार आहे. कामामध्ये खूप अडचणी आल्यामुळे मनस्ताप होण्याची शक्यता. मन शांत ठेवून कामे करा.

सिंह - आजचा आपला दिवस फार धावपळीचा जाऊ शकतो. महत्वाची कामे आज करणार आहात. मित्रांच्या सहकार्यामुळे कामामध्ये सुरळीतता लाभणार आहे. आनंदी दिवस.

कन्या - आजचा दिवस आपणास सर्वतोपरी चांगला जाणार आहे. महत्त्वाची कामे करून घ्या. सरकारी कामांमध्ये लक्ष घालून ती पूर्ण करा. आर्थिक उत्पन्नात चांगली वाढ होईल.

तुळ - आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपला दृष्टिकोन सकारात्मक असणार आहे. तुमच्या जवळच्या व्यक्तींकडून तुम्हाला सहकार्य व आनंद मिळणार आहे. कुटुंबातील आयुष्य समाधानी असेल.

वृश्चिक - कोणत्याही क्षेत्रामध्ये गुंतवणूक करताना फार धोका पत्करू नका. आज आपण सातत्याने काम केल्यास कामा मध्ये यश येण्याची शक्यता आहे.

धनु - आज आपण कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नका. कामामध्ये शांतपणा तसेच नियमितपणा ठेवणे आवश्यक आहे. जोडीदाराचे सहकार्य अपेक्षा पेक्षा कमी मिळणार आहे.

मकर - नोकरीमध्ये आपला दिवस चांगला जाणार आहे. आपल्याला जास्त काम पडले तरी हाताखालील लोकांचे सहकार्य मिळणार. मात्र शत्रू तोंड वर काढण्याची शक्यता आहे.

कुंभ - आपल्या योजना कार्यान्वित होण्यासाठी अत्यंत चांगला दिवस आहे. लेखक कवी यांच्या लिखाणासाठी त्यांची प्रशंसा होणार आहे. विद्यार्थ्यांना आजचा दिवस अनुकूल असणार आहे.

मीन - आजचा दिवस चांगल्या कारकिर्दी ने सुरू होणार आहे.योग्य दिशेने आपली पावले पडत आहेत.करियर मध्ये चांगले बदल होण्याची शक्यता आहे.

Iran War Impact : मध्यपूर्वेतील संघर्षातही देशात LPG पुरवठा सुरळीत; केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांना दिलासा; मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या जाहीर, पाहा वेळापत्रक

आखाती संघर्षाचा मच्छीमारांना फटका; 'बल्क कन्झ्युमर' वर्गीकरणामुळे संताप; डिझेल दरवाढीने मासेमारी व्यवसाय ठप्प

माथेरान 'मिनी ट्रेन'च्या फेऱ्या घटल्याने पर्यटक नाराज; 'मोटारकार' सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी

Mumbai : सिग्नलवरील मुलांसाठी आशेचा किरण! चेंबूरमध्ये 'सिग्नल स्कूल'ची सुरुवात, महापौरांच्या हस्ते उद्घाटन