आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २९ नोव्हेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, November 29, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आपल्या स्वताबद्दल आपणास आत्मविश्वास असणार आहे. अचानक प्रवास संभवतो. या प्रवासात आपणास चांगले फायदे मिळण्याची शक्यता आहे. मोठा बदल नको.

वृषभ - व्यवसायिक म्हणून काम करत असाल तर आजचा दिवस आपणास चांगला जाणार आहे. आपल्या कामातील अडथळे दूर होतील. निश्चित अशी प्रगती होणार आहे.

मिथुन - आजचा दिवस तसा मिश्रित स्वरूपाचा जाणार आहे.आज पैशापेक्षा कामात सुधारणा करण्याकडे आपण लक्ष द्यावे. नवीन काम येतील त्यातले योग्य पर्याय निवडायला लागणार आहे.

कर्क - मुख्य म्हणजे आपला आत्मविश्वास वाढवायला पाहिजे. आपल्यासमोर दोन प्रश्न आहेत एक तर स्वतःचे आरोग्य आणि कामातील अडथळे शांतपणे आणि सातत्याने काम करणे.

सिंह - मित्राआणि सहकार्‍यांशी सांभाळून वागा. निर्णय घेण्यामध्ये तरतमभाव जाणून मगच निर्णय घ्या. आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

कन्या - प्रकृतीस्वास्थ्य चा प्रश्न असू शकतो. त्यामुळे थकवा येणारे काम करू शकणार नाही. प्रत्येक प्रश्न सद्सद्विवेक बुद्धीने घ्या. राहत्या घरामध्ये काही त्रास असू शकतो.

तुळ - आजचा दिवस आपणास खूप आनंदाचा जाणार आहे. छोट्या छोट्या कारणांनी चिडचिड करू नका. आजच्या दिवसाचे नियोजन केल्यास सर्व कामे नीटनेटकी होणार आहेत.

वृश्चिक - आज आपण सर्व बाबतीत सकारात्मक विचार केले पाहिजेत. कामात जरी अडथळे आले तरी प्रयत्नाने ते सुटणार आहेत. आर्थिक प्रश्‍न सुटणार आहेत.

धनु - स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा. आपले प्रवास होण्याची शक्यता आहे. प्रवासामध्ये महत्त्वाचे निर्णय योग्य ठरणार आहे. व्यवसायात फायदा होईल.

मकर - नोकरीमध्ये जास्त कष्ट पडणार आहे. जास्त काम करावे लागणार आहे. त्यामुळे मनोबल कमकुवत होण्याची शक्यता आहे. पूर्ण आत्मविश्वासाने काम करणे आवश्यक आहे.

कुंभ - आजचा दिवस चांगला जाणार आहे. आपल्या कामाचे श्रेय आपल्याला मिळणार आहे. आपल्या स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पडल्यामुळे आपण खुश असणार आहात.

मीन - मालमत्तेच्या व्यवहारात मधून आपणाला चांगला फायदा मिळू शकतो. आर्थिक प्रश्न सहजतेने सुटणार आहेत. कामामध्ये चांगली प्रगती होणार आहे.

मुंबईतील हॉटेल्स बंद होणार? LPG टंचाईमुळे हॉटेल उद्योग संकटात; काळ्या बाजारातून गॅस खरेदीची भीती

मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम; Akasa Air च्या वेळापत्रकात बदल, जेद्दाहसाठी उड्डाणे सुरू तर काही शहरांतील सेवा बंद

ठाण्यात रिंग मेट्रोसाठी ३ हजार वृक्षांचा बळी; वृक्षप्रेमी नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण

एलएलबी, बीएड, बीपीएडसाठी ९० हजार विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार; अर्जातील दुरुस्तीसाठी उद्यापर्यंत ऑनलाइन सुविधा उपलब्ध

'त्या' परीक्षांच्या शुल्कासंदर्भात लवकरच निर्णय; राखीव प्रवर्गातील परीक्षार्थींबाबत केंद्र शासनाच्या प्रक्रियेचा समितीमार्फत अभ्यास करणार - शेलार