आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २९ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, October 29, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष : एखादी महत्त्वाची अनुकूल घटना घडल्यामुळे मानसिक प्रसन्नता लाभेल. उत्साहाने आपल्या पुढील कामे पूर्ण करू शकाल जोडीदाराची चांगली साथ मिळेल.कर्तृत्व सिद्ध करू शकाल.

वृषभ : एखादी भाग्यकारक घटना घडल्यामुळे भाग्य उदय होईल. कुटुंबात शुभवार्ता मिळतील. व्यवसाय धंद्यात तसेच नोकरीमध्ये समाधानकारक परिस्थिती अनुभवता येईल.

मिथुन : व्यवसायातील महत्त्वाची अडलेली कामे मार्गी लावू शकाल. जुने मित्रमंडळी भेटतील. काही महत्त्वाचे नियोजन करू शकाल. जवळचे तसेच दूरचे प्रवासाचे नियोजन होऊ शकते.

कर्क : अनेकांशी सुसंवाद घडवून आपली महत्त्वाची कामे पूर्ण करून घ्याल. आपले अंदाज व निर्णय बरोबर ठरल्यामुळे त्याचा आपल्याला आपल्या कार्यात उपयोग होईल.

सिंह :आपली दैनंदिन कामे अडथळ्याविना पूर्ण होत असलेली बघून आश्चर्य वाटेल. सामाजिक कार्यक्रमांची निमंत्रणे मिळू शकतात एखादे महत्त्वाचे स्थान अथवा पद मिळू शकते.

कन्या : नोकरीमध्ये आपल्याला पल्या सहकार्‍यांचे सहकार्य लाभल्यामुळे आपले काम सुकर होईल इतरांचे मार्गदर्शन लाभेल. मात्र आपल्या कामांमध्ये चालढकल करू नका .

तुळ : मनोबल उत्तम राहून आरोग्यही चांगले राहील. व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण कराल. व्यवसायात भागीदाराच्या मताला प्राधान्य देणे हिताचे ठरेल. जुनी येणी वसूल होतील.

वृश्चिक :कार्यक्षेत्र वाढून कार्य व्याप्तीही वाढेल मात्र आपल्या अधिकार कक्षेत काम करून आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करा. सरकारी नोकरी मध्ये अतिरिक्त कार्यभार सोपविला जाऊ शकतो.

धनु : सरकारी कामात विलंब लागू शकतो तसेच कुटुंबात व आपल्या कार्यक्षेत्रात लहान मोठ्या कारणांवरून वाद-विवाद घडण्याची शक्यता. कलह सदृश्य प्रसंग टाळणे हितकारक ठरेल.

मकर : जोडीदाराशी मधुर संबंध राहतील उत्साह आणि उमेद वाढेल आपल्या समोरील महत्त्वाची कामे वेगाने पूर्ण करू शकाल व्यवसाय धंद्यात नवीन भागीदारी विषयी विचारणा होऊ शकते.

कुंभ : काही वेळेस अचानक खर्च करावा लागू शकतो. आपल्या कार्यक्षेत्रात विरोधक, हितशत्रू इत्यादींचा त्रास संभवतो. स्वतःच्या कार्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक तसेच हितकारक ठरेल.

मीन : काही बाबतीत महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. निर्णय घेताना इतरांचा सल्ला उपयोगी पडू शकतो. कौटुंबिक सौख्य लाभून कुटुंबातील मुला-मुलीं कडून शुभवार्ता मिळतील.

दिवाळीच्या फराळात यंदा बनवा बिनपाकाचे रवा-बेसन लाडू; तोंडात टाकताच विरघळतील, लक्षात ठेवा 'या' टिप्स

दिवाळीपर्यंत चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो; आतापासूनच सुरू करा 'हे' उपाय

Mira-Bhayandar: धोकादायक इमारतींवर लक्ष ठेवणार विशेष पथक; दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेची खबरदारी

मतवारी दुष्काळाची! जग वाचवण्याचे उत्तर दोन ओळींत

१८ टक्के वाहनांकडून नियमांचे उल्लंघन; MMR मध्ये १५ दिवसांत ५,८२१ वाहनांवर कारवाई; ६.२० कोटींचा दंड, आतापर्यंत १.९२ कोटींची वसुली