आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, ३ जुलै २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, July 3, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आर्थिक लाभ चांगले होतील. विविध मार्गांनी पैसा मिळेल. संततीला यश मिळेल हातून धार्मिक पूजा पाठवा होतील. मनावरील ताण कमी होईल. भावंडांचे सख्य राहील.

वृषभ - मालमत्तेच्या कामामध्ये यश मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. महिलांना खरेदी करण्यासाठी संधी मिळेल. जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागेल. शब्दाने शब्द वाढत देऊ नका.

मिथुन - आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे. वारसा हक्काची कामे होतील. जोडीदाराशी चांगले संबंध राहतील. जोडीदार याची काळजी घ्या. आर्थिक आवक ठीकठाक राहील. खर्च मात्र वाढतील.

कर्क - रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तब्येतीकडे लक्ष द्या. मुलांवर रागवू नका. आर्थिक आवक चांगली राहील. प्रवास होतील खर्चाचे प्रमाण जास्त राहणार आहे.

सिंह - जोडीदाराशी चांगले पटेल. प्रवास करावा लागेल. पैशाची आवक चांगली राहिल. खर्च वाढू देऊ नका. जमिनीचे व्यवहार शक्यतो टाळा. संततीला जपा. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

कन्या - आपल्या स्वतःच्या कामांना महत्त्व द्या. शिक्षण क्षेत्रातील काम करणाऱ्यांना आजचा दिवस अनुकूल जाणार आहे. मुलांचे सहकार्य मिळेल. आपल्या बुद्धिचातुर्याने आपण काम पूर्ण कराल.

तुळ - प्रवास शक्यतो टाळा. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे.मुलांची प्रगती होईल. मुलांना चांगले मार्क्स मिळाल्यामुळे आपल्या ला समाधान वाटणार आहे आहे.

वृश्चिक - आपल्या मध्ये आत्मविश्वास भरपूर असणार आहे. आपल्या छंदांना जोपासा. त्यामध्ये प्रगती होईल. आपल्या कामा मध्ये फार घाई गर्दी नसल्यामुळे आजचा दिवस शांतपणे घालवाल.

धनु - आपल्या कार्यक्षेत्रात आपली चांगलीच घौड दौड चाललेली आहे. आपणास आज नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. नवीन कामात चांगल्या प्रकारे यश प्राप्त करून घ्या.

मकर - व्यवसायातील उलाढाली वाढणार आहे. आर्थिक कामाचे नियोजन करा, आर्थिक लाभ होणार आहे. खर्चाचे वाढते प्रमाण राहिले, तरी उत्पन्नही त्या प्रमाणात वाढणार आहे.

कुंभ - आजचा दिवस आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा आहे. आहे घरामध्ये उत्साहाचे वातावरण असेल. आपण लोकप्रिय असाल. सर्वसाधारणपणे आजचा दिवस आनंदमय जाणार आहे.

मीन - कामामध्ये उगाच धावपळ होणार नाही याची काळजी घ्या. दगदग होईल पण काम होणार नाही असे होऊ देऊ नका. त्यासाठी नियोजन करा. खर्चाचे प्रमाण ठीक-ठाक ठेवणे गरजेचे आहे.

पावसाळ्यात फरशी पुसल्यानंतरही घरात येतोय कुबट वास? मग एकदा 'हा' उपाय करून पाहाच

केतनला कुणी ढकललं? सिया गोयलच्या 'लाय डिटेक्टर' चाचणीसाठी पोलिसांची न्यायालयात धाव

बंगळुरूत काळाचा घाला! दगडखाणीत ४० फुटांवरून कोसळला ग्रॅनाइटचा महाकाय खडक; ८ मजुरांचा जागीच मृत्यू, अनेक जखमी

अटल टनेलबाहेर भरधाव स्कॉर्पिओला भीषण अपघात; लोखंडी सळ्या आरपार घुसल्याचा VIDEO समोर; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

Mumbai Rains : गटारात पडलेल्या व्यक्तीची दहिसर पोलिसांकडून सुखरूप सुटका; बचावकार्याचा Video व्हायरल