आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य,३ जून २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, June 3, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष : खर्चाच्या प्रमाणात वाढ होईल कुटुंबातील सदस्यांच्या मागण्या वाढतील त्यासाठी खर्च करावा लागेल मित्रमंडळींच्या वर्तुळातून आर्थिक मदतीची विचारणा होऊ शकते.

वृषभ : कुटुंबात एखादी मंगल कार्याचे नियोजन होईल आप्तेष्ट नातेवाईक यांच्या संपर्कात याल. व्यवसाय धंदा तसेच नोकरीतील परिस्थिती समाधान कारक राहील.

मिथुन :समाजातील मान्यवरांच्या ओळखी मध्ये वाढ होईल लोकसंपर्क वाढेल तसेच महत्त्वाच्या कामांमध्ये ओळखी मध्यस्थी उपयोगी पडतील. कौटुंबिक सुख लाभेल.

कर्क : काही आश्चर्यकारक घटना घडतील. नशीब पूर्णपणे साथ देईल. महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल पण त्यासाठी नियोजन आवश्यक ठरेल.

सिंह : दीर्घकाळ प्रलंबित असलेली सरकारी तसेच कायदेविषयक कार्य गतीमान होतील. जमीन जुमला तसेच स्थावर मालमत्ता इत्यादी संबंधित थांबलेले व्यवहार पुढे जातील.

कन्या : कुटुंब परिवारात मानसिक समाधान देणाऱ्या व आनंद देणाऱ्या वार्ता मिळतील कौटुंबिक सुख लाभेल. जोडीदाराचे म्हणणे किंवा मत बरोबर ठरेल.

तुळ : निरनिराळ्या मार्गांनी अचानक धनलाभ होऊ शकतो. व्यवसाय धंद्यात असलेली येणी वसूल होतील आपली कर्जे चुकती करू शकाल.

वृश्चिक : नोकरी धंदा व्यवसाय यामधील आपले कार्यक्षेत्र वाढणार आहे मात्र आपल्या कार्यक्षेत्राच्या मर्यादेत राहूनच आपली कार्ये पूर्ण करा. जबाबदाऱ्या वाढतील.

धनु : समाजातील मान्यवरांच्या सहवासात राहता येईल त्यांच्या विचारांनी प्रभावित व्हाल. कुटुंबात जोडीदाराशी मतभेद संभवतात वाद-विवाद टाळलेले चांगले.

मकर : मोठी कार्य हातून घडतील त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. चिंता मिटतील. मात्र आपल्या वागण्यात आणि बोलण्यावर नियंत्रण हवे इतरांच्या म्हणण्याला प्राधान्य द्या.

कुंभ : कुटुंबातील समस्या आपण सोडवाल. मुलांच्या प्रश्नात लक्ष घालाल. कुटुंबातील सदस्यांच्या मागण्या पूर्ण केल्यामुळे मानसिक समाधान लाभेल.

मीन : मित्रमंडळींबरोबर दिवस आनंदात आणि उत्साहात जाईल मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी व्हाल. मित्रमंडळी तसेच कुटुंबाबरोबर प्रवासाचे बेत आखाल.

बारा वर्षांत देशाचे वाजले की बारा..!

जून महिना कसा जाईल? बघा सिंह आणि कन्या राशीचे भविष्य

Environment Day 2026 : लहानपणापासून मुलांना शिकवा 'या' इको-फ्रेंडली सवयी

उसाचा रस पिताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका

झणझणीत आणि टेस्टी पेरी पेरी पनीर सँडविच; नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी